पुणेः कॉंग्रेस नेत्यांच्या नॅशनल हेराल्ड प्रकरणी भाजप युवा मोर्चाने शुक्रवारी दुपारी थेट कॉंग्रेस भवनावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला, त्यांना विरोध करण्यासाठी कॉंग्रेसचे कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस भवनासमोर तळ ठोकला, तर दुसरीकडे कॉंग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांनीही भाजपच्या कार्यालयावर मोर्चा काढत जशास तसे उत्तर दिले.