घाटकोपरमधील कामराज नगर इथं रहात असलेल्या एका १४ वर्षीय तरुणीला तिच्या काकानं अश्लील चाळे करत बेदम मारहाण केली. या तरुणीनं आरडाओरडा केल्यानंतर जमावानं या काकाला बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं. पंतनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करत आहे.