पुण्यात एका 70 वर्षीय नागरिकाला “मी राष्ट्रीय तपास यंत्रणेचा (NIA) चीफ बोलतोय” असं सांगत तब्बल 1 कोटी 45 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. आरोपींनी फिर्यादीला पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी जोडल्याचा बनाव रचला. “तुमचे बँक व्यवहार अतिरेक्यांना पैसे पुरवण्यासाठी वापरले गेले आहेत” अशी भीती दाखवत आरोपींनी विविध बँक खात्यांतून मोठी रक्कम उकळली. या प्रकरणी सायबर पोलिसांकडे गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे.