पुणे, ता. २ ः ‘‘कोणत्याही समाजाचे आणि भाषेचे अस्तित्व जमिनीवर अवलंबून असते. प्रगतीच्या नावावर आमच्याच जमिनी जाणार असतील आणि आपलेच लोक बेघर होणार असतील, तर तो विकास नसतो. आपले अस्तित्व पुसण्याचा तो डाव असतो. जर आपल्याला मराठी भाषा टिकवायची असेल; तर मराठी माणसाचे अस्तित्त्व टिकवणे गरजेचे आहे’’, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी येथे व्यक्त केले.