गेल्या काही दिवसांपासून शहरातील किमान व कमाल तापमानात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे नागरिकांना तीव्र उन्हाचा चटका सहन करावा लागत होता. मात्र, सोमवारी तापमानात लक्षणीय घट नोंदवण्यात आली आहे. परिणामी, वातावरणात काहीसा गारठा निर्माण झाला असून हवामान सुखावह झाले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुढील दोन दिवस तापमान साधारण स्थिर राहण्याची शक्यता वर्तवली आहे.