चक्क जिल्हा प्रशासनानं पंचगंगेच्या पाणीपातळीची खोटी माहिती दिल्याचा खबळजनक प्रकार समोर आला आहे. दिवसभरात पंचगंगेची पाणी पातळी दोन ते अडीच फुटानं वाढल्याची आकडेवारी जिल्हा प्रशासनानं जाहीर केली होती. प्रत्यक्षात पंचंगेच्या पाणी पातळीत कोणतीच वाढ झालेली नाही. आकडेवारीची तफावत लक्षात येतात जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस काढली. राजाराम बंधाऱ्यावर पाणीपातळी मोजणारा कर्मचारी उपस्थित न राहताच आकडेवारी देत होता. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला नोटीस काढून खुलासा मागवला आहे. पालकमंत्र्यांनी बैठक घेऊन 24 तास होण्याच्या आधीच कारभाराचा पंचनामा केला.