

Latest Marathi News Live
esakal
मुंबई : उपमुख्यमंत्री नरहरी झिरवाळ यांना लाचखोरी प्रकरणात दिलासा मिळाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात मंत्र्यांविरोधात कोणतेही ठोस पुरावे नसल्याचं स्पष्ट केलं आहे. प्राथमिक चौकशीनंतर संबंधित आरोपांना पुष्टी मिळाली नसल्यामुळे झिरवाळांना क्लीन चिट देण्यात आल्याचं सांगण्यात आलं. या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असून सरकारकडून पारदर्शक चौकशी झाल्याचा दावा करण्यात येत आहे.