Latest Marathi News Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Breaking Marathi News Updates 25 August 2025 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Maharashtra Live Marathi News update
Maharashtra Live Marathi News updateesakal
Updated on

एसटी कर्मचाऱ्यांचे उद्या पगार होणार

महाराष्ट्र सरकारने मागील आठवड्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्याचा पगार गणेशोत्सवानिमित्त 26 ऑगस्टला देण्याचा निर्णय जाहीर केला होता. आता महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनाही त्याच दिवशी पगार दिला जाणार आहे.

Nashik News: निफाड साखर कारखान्याला पिंपळस ग्रामपालिकेडून सील

पिंपळस रामाचे ता निफाड ग्रामपंचायतने मालमत्ता कर थकबाकी वसुलीसाठी बंद असलेल्या निफाड साखर कारखान्याकडे कायदेशीर तगादा लावला. आज सोमवार (ता 25) कारखान्याच्या मुख्य प्रवेश द्वाराला सरपंच , उपसरपंच आणि सदस्य यांच्या उपस्थित प्रशासनाने सील ठोकत नमुना क ची मालमत्ता व जंगम मालमत्ता जप्तीची कारवाई केली आहे. तर याच दरम्यान मुख्य कार्यालयातील प्रमुखाची ख्रुचीही ग्रामपंचायतीने  जप्त केली आहे. पिंपळस रामाचे ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या निफाड सहकारी साखर कारखान्याकडे  पिंपळस रामाचे ग्रामपंचायतीची 4 कोटी 23 लाख 40 हजार 275 रुपये थकबाकी होती. मात्र वेळोवेळी थकबाकी मिळणेबाबत ग्रामपालिकेने पत्र देऊनही सदरची थकबाकी न भरल्याने निसाका कार्यस्थळावर जप्तीची कारवाई करण्यात आली.

Chhatrapati Sambhajinagar: मराठा आरक्षण जनजागृती रथाचे फुलंब्रीत उत्साहात स्वागत

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने निघालेला रथ आणि अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा सोमवार (ता.२५) रोजी अंतरवली सराटीकडे जात असताना फुलंब्री शहरात पोहोचला. या ठिकाणी नागरिक, कार्यकर्ते, युवक-युवतींनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. पारंपरिक वेशभूषेत, ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या रोषणाईत स्वागत करण्यात आले. शहरातील प्रमुख चौकातून रथाची मिरवणूक काढण्यात आली. या वेळी कार्यकर्त्यांनी "एक मराठा, लाख मराठा", "आरक्षण आमचा हक्क आहे" अशा घोषणा देत वातावरण दुमदुमवले.

Thane News: एमएमआरडीएची गायमुख-कॅडबरी जंक्शन मेट्रो मार्गिका चाचणीसाठी तयारी सुरू

एमएमआरडीएने गायमुख आणि कॅडबरी जंक्शन दरम्यानच्या मेट्रो ४ आणि ४ए मार्गावर चाचणी धावण्याची तयारी सुरू केली आहे. डिसेंबरमध्ये मेट्रो ४ आणि ४ अ (वडाळा-ठाणे-कासारवडवली-गायमुख) मार्गिकेतील कॅडबरी जंक्शन ते गायमुख असा पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन एमएमआरडीएकडून आखण्यात आले आहे. त्यानुसार या टप्प्याच्या संचलनासाठी सप्टेंबरपासून मेट्रो गाड्यांच्या चाचण्यांना (ट्रायल रन) सुरुवात केली जाणार आहे.

Maratha Reservation: फडणवीसांनी शिंदेंना काम करु दिलं नाही- जरांगे

एकनाथ शिंदेंनी मराठा आरक्षणासाठी काम केलं, परंतु फडणवीस हे शिंदेंना काम करु देत नव्हते, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

Beed Live: वेळ पडली तर गेवराईतून निवडणुकीला उभं राहणार- हाके

वेळ पडली तर याच गेवराईमधून मी निवडणुकीला उभं राहील, असं विधान ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलं आहे. गेवराई येथील राड्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

Nashik News: येवला रस्त्यावरील अतिक्रमण हटवले

गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येवला शहरातील मुख्य रस्त्यांवर व व्यापारी भागात वाढलेल्या अनधिकृत अतिक्रमणांवर नगरपालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई केली. विंचूर चौफुली, इंद्रनील कॉर्नर, शनि पटांगण, इतर गर्दीच्या परिसरात अनधिकृतपणे रस्त्यावर ठेवलेले स्टॉल्स, टपऱ्या, फळ-भाजी गाड्या, फलक असे ५० वर अतिक्रमणे हटवण्यात आल्या. यामुळे काही विक्रेते व गाडेवाल्यांमध्ये सुरुवातीला नाराजी व्यक्त करत पर्यायी जागा द्यावी अशी मागणी केली. नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने सांगितले की, नागरिकांना वारंवार सूचना करूनही अतिक्रमण हटवले जात नसल्याने कारवाई करण्यात आली.

Pune News: सिंहगडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या पाच मुलांची हवेली पोलिसांनी केली सुटका

ट्रेकिंगसाठी गेले असता रस्ता चुकल्याने अडकले होते सिंहगडावर

व्हिडिओ पाठवून ट्रेकरने मागवली होती पोलिसांकडे मदत

चार तासाच्या थरारानंतर पाच ही ट्रेकची पुणे पोलिसांकडून सुटका

Animal Attack: गणोरीत वन्य प्राण्यामुळे मका पिकाचे नुकसान

तालुक्यातील गणोरी शिवारात गट नंबर 542 मध्ये बाळकृष्ण बाबुराव अंभोरे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांचे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना सोमवारी (ता.२५) समोर आली आहे. काही दिवसांपासून परिसरात रानडुक्कर व वन्य प्राण्यांचा वावर वाढला असून, त्यांनी रात्रीच्या वेळी शेतात शिरून उभ्या पिकावर हल्ला केला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Jalgaon News: मुक्ताईनगर येथे वाहतुकीस अडथळा ठरणारे अतिक्रमण काढले

मुक्ताईनगर येथील परिवर्तन चौकात वाहतुकीस अडथळा ठरत असलेले रस्त्यावरील अतिक्रमण पोलिस बंदोबस्तात नगरपंचायत तर्फे काढण्यात आले. वारंवार अतिक्रमण काढून देखील रस्त्यावर अतिक्रमण होत असल्याने वारंवार अपघात होता. या अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी जागा देण्यात यावी अशी मागणी होत आहे.

Beed Live : हाके आणि विजयसिंह पंडितांचे कार्यकर्ते आमनेसामने

हाके आणि विजयसिंह पंडितांचे कार्यकर्ते आमनेसामने

बीडच्या गेवराईत कार्यकर्ते आमनेसामने

Nashik Live: येवला शहरात अतिक्रमण मोहीम, सूचना देऊनही अतिक्रमण हटवले जात नसल्याने अखेर कारवाई

गणेशोत्सवयाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या येवला शहरात नगरपरिषद व पोलीस यांच्या संयुक्तपणे शहरातील मुख्य रस्त्यांवरील व व्यापारी भागात वाढलेल्या अनधिकृत अतिक्रमणा वर कारवाई करण्यात आली,वर्दळ असलेल्या रस्त्यांवर असलेल्या,टपऱ्या,स्टोल,फळ विक्रते,हाथगाडीवाले यांचे अतिक्रमण हटवण्यात आले,वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण हटवले जात नसल्याने अखेर कारवाई करण्यात आली.

Live: अंतराळवीर शुभांशु शुक्ला आणि त्यांच्या कुटुंबियांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री यांची भेट घेतली

 अंतराळवीर शुभांशु शुक्ला आणि त्यांच्या कुटुंबियांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री यांची भेट घेतली

Live: टोमेटोच्या दरात घसरण,आवक वाढली,दर घसरले

नाशिक जिल्ह्यातील चांदवड,मनमाड परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटो ची लागवड केली असून,टोमॅटोची काढणी जोरात सुरू झालीय,काही दिवसांपूर्वी 700 ते 800 रुपये क्रेट दर मिळत असताना अचानक आवक वाढल्याने दर कोसळले असून 20 किलोच्या क्रेट ला अवघा 450 ते 500 रुपये दर मिळू लागला आहे,मात्र किरकोळ बाजार टोमॅटो 30 ते 40 रुपये किलो ने विकला जात आहे,दर घासल्याने लागवडीसाठी झालेला खर्च,गाडी भाडे,काढणीचा मजुरी खर्च या मिळत असलेल्या भावात वसूल होत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

Live: पुण्यातील वडाचीवाडीमध्ये दुचाकी घसरण्याचे सत्र सुरूच

पुण्यातील वडाचीवाडीमध्ये दुचाकी घसरण्याचे सत्र सुरूच

दुचाकी घसरून लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक जखमी

लागोपाठ सहा दुचाकी घसरून अपघात घडल्याची घटना आज वडाचीवाडी उंड्री रस्त्यावर घडली

यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र काही दुचाकी चालकांना गंभीर दुखापतीला सामोरे जावे लागले आहे

पावसाने उघडीप दिली मात्र दुचाकी घसरण्याची नवी समस्या

रस्त्यावर झालेल्या चिखलातून गाड्या घसरण्याची प्रमाण वाढले आहे

एका जेस्ट नागरिकाला पायाला गंभीर दुखापत झाली,तर शाळेत सोडवण्यात आलेल्या महिलेची गाडी घसरून पडल्याने तिला आणि लहान मुलाला दुखापत झाली

अपघातामध्ये लहान मुलाला तोंडाला दुखापत

हा रस्ता रुंदीला लहान आहे त्यातच येथे खडी वाहतूक करणारे डंपर लांब रंग लावून रास्तच अडवत असल्याचा आरोप

 Live: मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईदौऱ्यासाठी अंतरवाली सराटीत जोरदार तयारी

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईदौऱ्यासाठी अंतरवाली सराटीत जोरदार तयारी...

लेझीम पथकाची रंगीत तालीम, मनोज जरांगे देखील झाले सहभागी..

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असलेली गाडी अंतरवाली सराटीत दाखल...

27 ऑगस्टला सकाळी मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना होणार आहेत...

Nashik Live: गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला

- गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला

- दुपारी ३ वाजल्यापासून गंगापूर धरणातून १८८९ क्यूसेक वेगानं पाण्याचा विसर्ग

- धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम असल्यानं धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला

- पावसाची संततधार कायम राहिल्यास टप्प्याटप्प्याने धरणातून करण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार

Live: तोडफोड अन् दहशत माजवणाऱ्या मुलांची कोंढवा पोलिसांनी काढली धिंड

- पुण्याच्या कोंढव्यात वाहनांची तोडफोड अन् दहशत करणाऱ्या मुलांची कोंढवा पोलिसांनी काढली धिंड

- एका आरोपीसह तीन अल्पवयीन ताब्यात

- कोंढव्यात मिटानगर भागात अल्पवयीन 20 ते 25 जणांच्या टोळक्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन रिक्षा दोन कारच्या काचा फोडून परिसरात थैमान घातल्याचा व्हिडिओ वायरल झाला होता.

- या प्रकरणी चौघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन अल्पवयींन ताब्यात घेतले आहे.

Live : येवल्यात पैठणीचा फेटा व पैठणी वस्त्र परिधान केलेल्या गणरायाचे आगमन

गणेशोत्सवाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या भक्तांसाठी यंदा बाजारपेठेत एक वेगळे आकर्षण ठरले आहे.पैठणी नगरी असलेल्या येवल्यात पैठणीची झळाळी आणि परंपरेचा साज घेऊन गणराय बाजारात दाखल झाले आहेत. पैठणीचे वस्त्र परिधान केलेल्या आणि पैठणी फेटा मिरवणाऱ्या गणेशमूर्तींनी भक्तांची मने जिंकली आहेत.पारंपरिक मराठमोळा थाट, नाजूक डिझाइन आणि पैठणीच्या रंगीबेरंगी झळाळीमुळे हा बाप्पा भक्तांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.

Pune Live : राजा बहाद्दूरमिलमधील 'डी मोरा' पबमध्ये फ्रेशर पार्टीत अंडर 21 च्या मुलांचं तुफान राडा

राजा बहाद्दूरमिलमधील 'डी मोरा' पबमध्ये फ्रेशर पार्टीत अंडर 21 च्या मुलांचं तुफान राडा

बॉटलवर बॉटल उडवून इंन्जॉय.

पुण्यात फ्रेशर पार्ट्यानी क्रेझ

दररोज पार्ट्या, सर्व मूल कॉलेजचे मुल...

अनेक पार्ट्या बेकायदा नियोजन

गेल्या आठ दिवसांपासून पुण्यनगरीत फ्रेशर पार्टीचे आयोजन केले जाऊ लागले असून, त्यामध्ये नामांकित महाविद्यालयाचे मुल जी २० वर्षांच्या आतील आहेत, अशा मुलांना दारू दिली जाऊ लागली आहे.

पुण्यातील वेगेवगेळ्या पब्स व पंचातारांकित हॉटेल्समध्ये या पार्ट्या सुरू आहेत.

दोन दिवसांपुर्वी मनसेने राजा बह्हादुदूर मेील मधील किकी येथील एक पार्टीवर धाड टाकली होती. त्यापुर्वी मुंढव्यातील पार्टीवरून स्थानिक नागरिक व मुलांमध्ये गोंधळ घातला होता. तत्पुर्वी पोलिसांनी या हॉटेल्ससाठी एक समिती नेमली आहे. त्यावर पोलिसांची, पालिकेची व राज्य उत्पादन शुल्क विभागाची नजर असणार असल्याचे सांगितले होते. तरीही अशा पार्ट्यांचे नियोजन होत असल्याचे दिसत आहे.

Mumbai Live : कांदिवलीत पुनर्विकास सुरू असलेली कांती टेरेस इमारत कोसळली

कांदिवलीत पुनर्विकास सुरू असलेली कांती टेरेस इमारत कोसळली

आज सकाळच्या 9 च्या सुमारास कांदिवली पोलिस ठाणे हद्दीतील एस. व्ही. रोडवरील कांती टेरेस ही पुनर्विकासासाठी गेलेली इमारत कोसळल्याची घटना घडली.

सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची माहिती नाही. घटनेनंतर तात्काळ कांदिवली पोलिस आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (BMC) पथक घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवले आहे.

या इमारतीचे पुनर्विकासाचे काम सुरू असताना आज सकाळी हा अपघात घडला. परिसरात सुरक्षिततेसाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात येत आहे.

Live : गणेशोत्सवामुळे 26 ऑगस्टला मिळणार सरकारी अधिकाऱ्यांना पगार 

श्रीगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तमाम सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचं वेतन आणि निवृत्ती वेतन हे उद्या, अर्थात २६ ऑगस्टला त्यांच्या बँक खात्यात जमा होईल. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.

Pune Live : गणरायाच्या आगमन आणि विसर्जनाच्या दिवशी पुणे जिल्ह्यात "ड्राय डे" घोषित

  • गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

  • गणपती आगमन आणि विसर्जन दिवशी संपूर्ण पुणे जिल्ह्यात दारूबंदी

  • २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या काळात पुणे शहरातील खडक, विश्रामबाग आणि फरासखाना पोलीस ठाण्यातील अंतर्गत येणाऱ्या सर्व दारू विक्रेत्यांना सक्त ताकीद

  • या कालावधीत तिन्ही पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणारी दारूचे दुकानं बंद ठेवण्याचे आदेश

  • पुणे जिल्ह्यात पाचव्या आणि सातव्या दिवसाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात

  • आदेशाचे पालन न करणाऱ्या विरोधात प्रशासनाकडून कठोर कारवाईचा इशारा

Pune Live : गोरक्षका विरुद्ध कारवाई करण्यासाठी आमदार सदाभाऊ खोत पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये दाखल

गोरक्षका विरुद्ध कारवाई करण्यासाठी आमदार सदाभाऊ खोत पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये दाखल

न्यायालयाच्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना गोरक्षकाने घेऊन गेलेल्या म्हशी परत द्यावा असा आदेश आहे.

मात्र तरीदेखील कुठलीही कारवाई यासंदर्भात होत नसल्याने सदाभाऊ खोत आक्रमक

सदाभाऊ खोत यांची पोलीस अधिकाऱ्यांसोबत सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये बैठक सुरू

सदाभाऊ खोत यांच्यासोबत शेतकरी ही पोलीस स्टेशनमध्ये दाखल

Delhi Live Update: राबुका हे भारताच्या तीन दिवसीय अधिकृत दौऱ्यावर आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिजीचे पंतप्रधान सिटिवेनी लिगामामाडा राबुका यांची नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे भेट घेतली. राबुका हे भारताच्या तीन दिवसीय अधिकृत दौऱ्यावर आहेत.

Pune Live Update: सिंहगड रस्त्यावरील असलेला पूल सुरू करण्यासाठी मनसेचं आंदोलन

  • सिंहगड रस्त्यावरील असलेला पूल सुरू करण्यासाठी मनसेचं आंदोलन

  • मनसे वाहतुकीसाठी बंद केलेला उड्डाणपूल खुला करणार

  • सिंहगड रोड उड्डाणपुलाल तयार होऊन एक महिना झाला तरी त्याचे उद्घाटन करण्यास प्रशासनाची टाळाटाळ

  • सिंहगड उड्डाणपुलाचे उद्घाटन मनसे करणार

  • सिंहगड उड्डाणपुलाजवळ मोठा पोलीस बंदोबस्त

Manoj Jarange Live Update: मराठा आंदोलन : "फडणवीस वाकड्यात घुसतात, म्हणून मी असं बोलतो" – मनोज जरांगे

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा वातावरण तापले आहे. मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट टीका केली आहे. जरांगे म्हणाले, “फडणवीस वाकड्यात घुसतात, म्हणून मी असं बोलतो. मराठ्यांना आरक्षण द्या, मी त्याला डोक्यावर घेऊन नाचेन.”

ते पुढे म्हणाले की, मराठा समाजाची मागणी रास्त असून सरकारने ती लांबवण्यापेक्षा तातडीने निर्णय घ्यावा. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला. राज्यात सध्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या चर्चेला पुन्हा वेग आला आहे.

Amit Shah Live Update: आम्ही विरोधकांना जेपीसीत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे - गृहमंत्री अमित शहा

"विरोधकांनी संसदेचे नियम न पाळता फक्त स्वतःची इच्छा लादण्याचा हट्ट धरू नये. आम्ही त्यांना जेपीसीत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. मात्र त्यांनी बहिष्कार घातला तर सरकारकडे पर्याय नाही" – गृहमंत्री अमित शहा

Manoj Jarange Live Update: २९ ऑगस्टपासून मुंबईत मराठा आरक्षणासाठी आंदोलन

२९ ऑगस्टपासून मुंबईत मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला होणार सुरुवात

Manoj Jarange Live Update: परळीत मनोज जरांगे पाटील यांच्या बॅनरवर झळकले दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचा फोटो...

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे 29 ऑगस्ट रोजी मुंबई येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन होणार आहे.परळी तालुक्यातील हजारोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईच्या दिशेने निर्माण होणार आहे. त्यातच परळी येथे चलो मुंबई असे आशयाचे मोठे होर्डिंग लावले गेले आहे. आणि याच होर्डिंग वर मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचा फोटो देखील लावण्यात आलेला आहे. मराठा समन्वयक अमित घाडगे पाटील यांनी परळीत राणी लक्ष्मीबाई चौकात लावलेले हे होर्डिंग चर्चेचा विषय ठरत आहे.

Nagpur Live Update: नागपुरात काँग्रेस पक्षाकडून महापालिकेत अनोखे आंदोलन

नागपुरात काँग्रेस पक्षाकडून महापालिकेत अनोखे आंदोलन करण्यात येत आहे.

शहरातील विविध रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात हे आंदोलन सुरू असून या आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांनी शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांच्या फोटो आणि जीपीएस लोकेशनसह हे आंदोलन सुरू केले आहे.

मनपाचा खड्डे मुक्त नागपूरचा दावा खोटा ठरवण्यासाठी एका प्रकारे काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुरावेच या आंदोलनात आणले आहे.

LiveUpdate: नाशिकमधील सार्वजनिक गणेश मंडळांचा गणेशोत्सवावर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत

गणेशोत्सव अवघ्या २ दिवसांवर आला तरी अद्याप शहरातील सार्वजनिक गणेश मंडळे महापालिकेच्या परवानगीच्या प्रतीक्षेत. शहरात जवळपास १८०० सार्वजनिक गणेश मंडळे मात्र परवानगी अवघ्या १५ गणेश मंडळांना. महापालिका प्रशासनाकडून परवानगी मिळत नसल्याने सार्वजनिक गणेश मंडळ आक्रमक. परवानगीसाठी गणेश मंडळांनी शुल्क भरण्याच्या महापालिकेच्या सूचना

LiveUpdate: भरधाव इनोव्हा कार अपघातग्रस्त ट्रक वर धडकून भीषण अपघात

राष्ट्रीय महामार्ग क्र 6 वर खामगाव जवळ वळण मार्गावर सकाळी अपघात. कार धुळे येथून नागपूर कडे जाताना सकाळी झाला अपघात. अपघातात कार मधील दोघे गंभीर जखमी. जखमींवर खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचार

Maharashtra Live : देवेंद्र फडणवीस हे वोटचोर, अपात्र महिलांना १५०० रुपये देऊन मते विकत घेतली, ठाकरे गटाची टीका

महिलांना स्वाभिमानी आणि आत्मनिर्भर बनवणे हीच सक्षमीकरणाची व्याख्या आहे. महिला अपात्र असतानाही पंधराशे रुपयांच्या बदल्यात त्यांची मते विकत घेऊन किंवा चोरून सरकार स्थापन करणे ही त्या महिलांची व राज्याची फसवणूक आहे, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.

Dharashiv Live : पिता पुञाची १६ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक

धाराशिव च्या तुळजापूर मधील पिता पुञाची अज्ञात आरोपींनी अधिक पैशाच्या आमिषाने फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय. कालिदास लिंबाजी गवळी व मुलगा कृष्णा याला आरोपींनी अधिक पैशाचे आमिष दाखवले.एक बनावट लिंक तयार करुन ती व्हॉट्सअॅपने पाठवली या लिंक द्वारे पिता पुञाची १६ लाख ८५ हजार ४९८ रुपयांची अॉनलाईन फसवणूक करण्यात आली

Mumbai Live : कल्याण - शीळ रोडवर मोठा दिशा दर्शक फलक अचानक कोसळला...

कल्याण शीळ रोडवर गेले काही दिवस प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे, यातच मध्यरात्री अचानक मोठा दिशा दर्शक फलक अचानक रस्त्यावर कोसळला आणि काही काळ दोन्ही साईडची वाहतुक ठप्प झाली होती.दरम्यान घटनास्थळी मनसे नेते राजू पाटील, पदाधिकारी योगेश पाटील घटनास्थळी पोहचले आणि पोलीस, फायब्रिगेड यांना बोलवून घेऊन पडलेला फलक बाजूला काढला.. दरम्यान या घटनेत एक बाइक स्वार जखमी होता होता वाचला..

Nagpur Live: गणेशोत्सवाच्या काळात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

- नागपूर सहित विदर्भातील काही भागात बुधवारी पावसाचा अंदाज

- मंगळवार ते बुधवार दरम्यान नागपूर सह विदर्भात पावसाचा अंदाज

- मंगळवारी नागपूर,भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट

- तर बुधवारी या पाच जिल्ह्यांसह अमरावती, वर्धा अशा सात जिल्ह्यांना येलो अलर्ट

- तर गुरुवारी संपूर्ण विदर्भाला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय...

Nagpur Live : 'व्हिजिलन्स सेल'ने स्वातंत्र्यपूर्व काळातील दस्तऐवजांची वैधता मान्य केल्यावर पुनर्पडताळणीचे आदेश देता कामा नये- नागपूर उच्च न्यायालय

- जात पडताळणी दरम्यान एकदा 'व्हिजिलन्स सेल'ने स्वातंत्र्यपूर्व काळातील दस्तऐवजांची वैधता मान्य केल्यावर पुनर्पडताळणीस आदेश देता कामा नये, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई न्यायालयाच्या खंडपीठाने दिला.

- अमरावती येथील जातवैधता समितीच्या आदेशा विरोधात दाखल प्रकरणात सुनावणी दरम्यान निकाल..

- याचिकाकर्त्यांनी १९३२ सालच्या कोतवाल पुस्तकातील नोंद सादर केली होती...त्यात २ मे २०१९च्या पहिल्या व्हिजिलन्स सेल अहवालात नोंद पडताळून खरेपणा मान्य केला

- मात्र, समितीने कोणतेही कारण न नोंदवता दुसऱ्या पडताळणीत नोंद फेटाळण्यात आली.

- जातपडताळणी समितीचेकार्य फक्त अर्जदाराने सादर केलेल्या पुराव्यांची तपासणी करण्यापुरतेच मर्यादित आहे. समिती स्वतःहून पुरावे जमा करून दावा सिद्ध किंवा खोडून काढू शकत नाही.

- २००३च्या नियमांनुसार, समिती अर्जदाराने दिलेल्या पुराव्यांवर असमाधानी असल्यासच प्रकरण 'व्हिजिलन्स सेल'ला पाठवता येते, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

Maharashtra Live : सीएनजी ‘हायड्रो टेस्टिंग’चे दर तब्बल तिपटीने वाढले; चालकांमध्ये नाराजी

सीएनजी वाहनांच्या ‘हायड्रो टेस्टिंग’चे शुल्क वितरकांनी अचानक वाढवून २,८०० ते ३,००० रुपये केले आहे.

काही महिन्यांपूर्वी हेच शुल्क फक्त ५०० ते ७०० रुपये होते. या प्रचंड वाढीमुळे खासगी वाहनधारक आणि रिक्षाचालकांवर आर्थिक ताण आला आहे

.

रिक्षा संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दर तीन वर्षांनी सुरक्षिततेसाठी आवश्यक असणाऱ्या या तपासणीच्या दरवाढीवर सरकारने तातडीने नियंत्रण आणावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

वाढलेला खर्च रिक्षा-टॅक्सी भाड्यात वाढ करून प्रवाशांवर टाकला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर तोडगा न निघाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Tuljapur News Live : बनावट लिंक पाठवून पिता-पुत्रांची १६ लाखांची फसवणूक

तुळजापुर मधील पिता पुञाची १६ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आलीय. बनावट लिंक पाठवुन धाराशिव च्या तुळजापूर मधील पिता पुञाची अज्ञात आरोपींनी अधिक पैशाच्या आमिषाने फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय. कालिदास लिंबाजी गवळी व मुलगा कृष्णा याला आरोपींनी अधिक पैशाचे आमिष दाखवले.एक बनावट लिंक तयार करुन ती व्हॉट्सअॅपने पाठवली या लिंकद्वारे पिता पुञाची १६ लाख ८५ हजार ४९८ रुपयांची अॉनलाईन फसवणूक करण्यात आली.

Bhandara News Live : जुगार अड्ड्यावर छाप्यात 7 जणांना अटक

पोळ्याच्या सणात ग्रामीण भागात जुगार मोठ्या प्रमाणात खेळला जातो. लाखनी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या केसलवाडा वाघ या गावात एका ठिकाणी जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी केलेल्या या कारवाई 7 जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून 6 मोबाईल, 4 दुचाकी, रोख रक्कम असा एकूण 3 लाखांचा मुद्देमाल लाखनी पोलिसांनी जप्त केला.

Maharashtra Weather Updates : राज्यात २९ ऑगस्टपर्यंत पावसाची रिपरिप, हवामान विभागाचा अंदाज

राज्यातील काही जिल्ह्यातच 29 ऑगस्टपर्यंत पाऊस सुरू राहणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र अन् विदर्भातच हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि उत्तर महष्ट्रात तुलनेत पाऊस खूप कमी झाला आहे. गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यात तुफान पाऊस सुरू आहे. त्याचा परिणाम म्हणून राज्यातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस सुरू झाला आहे. बहुतांश भागात हलका ते मध्यम पावसाने हजेरी लावली. यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना समावेश आहे.

Varandh Ghat Reopen : रायगड-पुण्याला जोडणारा वरंध घाट वाहतुकीसाठी खुला

रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. पावसाळ्या दरम्यान वारंवार घडणाऱ्या दरड दुर्घटनेच्या घटनांच्या पार्श्वभुमीवर रायगड आणि पुणे जिल्हा प्रशासनाने वरंध घाट वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या बंदीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता तर आगामी गणेशोत्सव व सणासुदीच्या काळात या रस्त्यावरील वाहतूक सुरु करण्याची मागणी वारंवार स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांकडून केली जात होती. या मागणीच्या अनुषंघाने रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी परिपत्रक काढून वरंध घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी खुला केला असून अतिवृष्टीचे काळात घाटातुन वाहतुक बंद ठेवण्याच्या निर्देश देखील केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com