पुण्यातील विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल. वैशाली वैभव दोशी (वय ४४) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २३ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता पुणे विमानतळावर घडली. मूळच्या बारामती मधील राहणाऱ्या दोशी या तंत्र विद्येचा व्यवसाय करतात. त्या पुण्यावरून इंदौरमार्गे दिल्लीला निघाल्या होत्या. बॅग तपासणीदरम्यान संशयास्पद "मेटल डिटेक्ट" झाल्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवले आणि बॅग उघडण्यास सांगितली. यावेळी तपासणी दरम्यान, त्यांच्या बॅग मध्ये १ पिस्तूल व जिवंत काडतुसे आढळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांना हे पिस्तूल त्यांच्या एका शिष्याने दिले होते आणि त्या जंगलात जाऊन पूजा करत असल्याने त्यांना याची गरज आहे असं त्यांनी पोलिसांना सांगितलं. अधिक चौकशींकेळी असता त्यांच्याकडे परवाना नसल्याचे स्पष्ट झालं आहे. २३ सप्टेंबर रोजी दोशी या एअर इंडिया एक्सप्रेसच्या पुणे–इंदौर–दिल्ली फ्लाईटने प्रवास करणार होत्या. दोशी यांच्यावर विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.