जळगावमधील केळी पीक विम्याच्या लाभातील प्रशासकीय अडथळा अखेर लवकरच दूर होणार आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई वाटपाची प्रक्रिया सुरू होईल. जळगाव जिल्ह्यात सुमारे १ लाख ८० हजार लाख हेक्टर क्षेत्रावर केळी लागवड होत आहे. हवामानाधारित फळ पीक विमा योजनेअंतर्गत उन्हाळ्यातील अतिउच्च तापमानामुळे केळीचे नुकसान होते. या नुकसानभरपाईचे दावे ३१ जुलै २०२५ पर्यंत वितरित होणे अपेक्षित होते. पण हवामान केंद्रांची प्रमाणित आकडेवारी उपलब्ध न झाल्याने शेतकऱ्यांना विमा रकमेपासून वंचित राहावे लागले.