राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महात्मा फुले पुण्यतिथी व समता दिनानिमित्त फुले वाड्याला भेट दिली. यावेळी त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांना आदरांजली वाहिली. निवडणुकीच्या प्रचारासाठी शिरूरमध्ये सभा असल्याने अजितदादांनी पहाटेच फुले वाड्यात हजेरी लावली.