कोल्हापुरात कणेरीवाडीत युवकाची आत्महत्या
चार्जर घेऊन येतो, असे सांगून घराबाहेर पडलेल्या युवकाने मित्राच्या खोलीत गळफास घेतल्याची घटना कणेरीवाडीत उघडकीस आली. प्रेम परशुराम सूर्यवंशी (वय १८, रा. कणेरीवाडी, मूळ रा. चिकोडी) असे मृताचे नाव आहे.
प्रेम इयत्ता बारावीत शिकत होता. त्यासोबतच दुपारनंतर तो एमआयडीसीत कामही करत होता. त्याच्या मागे आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.