
नववर्षारंभाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी पुणे कॅम्प (लष्कर), डेक्कन व शिवाजीनगर परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यानिमित्त वाहतूक पोलिसांनी ३१ डिसेंबरच्या सायंकाळी पाच वाजल्यापासून गर्दी कमी होईपर्यंत प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत, अशी माहिती वाहतूक पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.