पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. आता भारताने केलेल्या हल्ल्याबाबत पाकिस्तानने म्हटलं की, रावळपिंडीतील विमानतळ आणि लष्करी तळावर हल्ले झाले त्याची पाकिस्तानी लष्कराला कल्पनाच नव्हती. आम्ही हल्ला करायच्या आधीच त्यांचे ब्रह्मोस आमच्या विमानतळांवर धडकले असं पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणालेत.