सध्या मुंबईत सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ अॅक्शन मोडवर आले असून त्यांनी उद्या ओबीसी नेत्यांची महत्त्वाची बैठक बोलावली असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणाबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. तसेच या बैठकीनंतर पत्रकार परिषद देखील होणार असून यामध्ये मनोज जरांगे यांनी आग्रह धरलेल्या हैदराबाद गॅझेट आणि औंध गॅझेटबाबतचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश पत्रकार परिषदेतून मांडण्यात येणार आहे.