भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पंजाबमधील विधानसभेच्या होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी आपल्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून, या यादीत बीडचे रवींद्र दळवी यांचाही समावेश करण्यात आला आहे. काँग्रेसच्या या प्रचारक यादीत सचिन पायलट, भूपेश बघेल, पवन खेरा, इमरान प्रतापगढी यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांसह दळवी यांचा समावेश आहे हे विशेष.