
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "महारेलने महाराष्ट्रात उड्डाणपूल बांधण्याच्या गतीचा नवा विक्रम केला आहे. येत्या काही दिवसांत या कंपनीच्या माध्यमातून 200 उड्डाणपूल आणि अंडरपासचे काम पूर्ण केले जाणार आहे. देशात पायाभूत सुविधांची संख्या सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात मेट्रो, रस्ते, महामार्ग, विमानतळ, बंदरे अशा सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधांची कामे वेगाने सुरू आहेत.