जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा 378 वा बीज सोहळा मोठ्या उत्साहात आज देहू नगरीत संपन्न होणार आहे. बारा वाजता नांदूरकीच्या झाडावर भाविक आपल्या हातातील पुष्प अर्पण करून हा सोहळा साजरा करणार आहे. या बीज सूर्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक देहू नगरीत दाखल होत आहेत.