मल्याळम अभिनेत्री नव्या नायरला ऑस्ट्रेलियात एक लाखाचा दंड करण्यात आलाय. मेलबर्न विमानतळावर केसात गजरा असल्याच्या कारणावरून तिच्यावर कारवाई केली गेलीय. ऑस्ट्रेलियात ताजी फुलं आणि झाडांचे अवशेष आयात करणं कायद्यानुसार गुन्हा आहे. ओनम सणानिमित्त अभिनेत्रीनं केसात गजरा माळला होता.