

Birth Dates May Become Mandatory on Wedding Cards
Esakal
राज्यात बालविवाह रोखण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी आता लग्नासंदर्भात राज्य सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिदती दिली आहे. लग्नपत्रिकेवर आता वधू आणि वराच्या नावानंतर जन्मतारीख लिहावी लागणार आहे. राजस्थानमध्ये असा निर्णय याआधी घेण्यात आला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात हा निर्णय घेतला जाणार असल्याचं समजते.