esakal | नारायण राणेंच्या 'दादागिरी'वर उदय सामंतांनी दिलं उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

Narayan-Rane

नारायण राणेंच्या 'दादागिरी'वर उदय सामंतांनी दिलं उत्तर

sakal_logo
By
दीनानाथ परब

रत्नागिरी: केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांचा अधिकाऱ्याला धमकावत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नारायण राणे यांनी पूरग्रस्त कोकणचा दौरा केला. त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) आणि प्रवीण दरेकर त्यांच्यासोबत होते. नारायण राणेंच्या कोकण दौऱ्याच्यावेळी (kokan tour) काही अधिकारी तिथे उपस्थित नव्हते. हे अधिकारी नंतर हजर झाले, त्यावेळी नारायण राणेंनी त्यांना फैलावर घेतले. नारायण राणे अधिकाऱ्याला धमकावत (threatning officer) असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावरुन रत्नागिरीचे आमदार आणि राज्याचे उच्चशिक्षण-तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राणेंवर टीका केली आहे. (Maharashtra minister uday samant slam central minister narayan rane for threatning officer dmp82)

"एकनाथ शिंदे नगरसविकास खात्याचे मंत्री आहे. ते सुद्धा कोकण दौऱ्यावर होते. अधिकाऱ्यांनी माझ्यासोबच येण्याची आवश्यकता नाही. कारण मी शिवसेनेमार्फत मदत घेऊन आलोय. मी नगरविकास खात्याचा मंत्री म्हणून नगरपालिकेला मदत करायला आलोय. माझ्यासोबत माझा सीओ आहे. या व्यतिरिक्त जिल्हाधिकारी, आरडीसी कोणी माझ्यासोबत नको. त्यांनी त्यांची यंत्रणा राबावावी असे एकनाथ शिंदे म्हणाल्याचे" उदय सामंत यांनी सांगितले.

हेही वाचा: 'बर्तनवाली', 'सिंगल मदर'ची स्क्रिप्ट दाखवून ओढायचे पॉर्नच्या जाळ्यात, समोर आली धक्कादायक माहिती

"मी कॅबिनेट मंत्री म्हणून स्वत: सहादिवस कोकणात आहे. मी आज रत्नागिरीत आहे, काल सिंधुदुर्गात होतो. स्थानिक लोकप्रतिनिधी, मंत्र्यांनी प्रोटोकॉलचा विचार न करता तिथे थांबण आवश्यक आहे. मला अधिकारी नको असं मी सांगितलं. अशा पदध्तीने अधिकारी नाहीत म्हणून नैसर्गिक आपत्तीच्यावेळी भडकणं योग्य नाही" अशा शब्दात उदय सामंत यांनी नाव न घेता राणेंवर प्रहार केला.

हेही वाचा: पॉर्न वेबसाइट्सवर 'हॉटशॉट'च्या जाहिरातसाठी राज कुंद्राने मोजले लाखो रुपये

"मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख म्हणून दौरा करतायत. लोक त्यांचं सर्वत्र स्वागत करतायत. मुख्यमंत्री फिरतायत म्हणून आपणही फिरलं पाहिजे ती भावना योग्य नाही. मुख्यमंत्र्यांचा चिपळूण दौरा फक्त १० मिनिटांचा झाला नाही. लोकांना दाखवण्यासाठी हा दौरा नव्हता. मुख्यमंत्री स्वत: चिपळूणच्या बाजारपेठेत दीड किलोमीटरपर्यंत फिरले. लोकांच्या समस्या समजून घेतल्या" असे उदय सामंतांनी सांगितले.

loading image
go to top