Anil Parabsakal
महाराष्ट्र बातम्या
Anil Parab : राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे मुंबईत डान्सबार; आमदार अनिल परब यांचा आरोप
राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने मुंबईत डान्सबार असल्याचा आरोप अनिल परब यांनी विधानपरिषदेत केला.
राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने मुंबईत डान्सबार असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत केला.
त्यांनी कदम यांच्यावर पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी वाळू चोरीचा आरोप केला होता. यानंतर आता त्यांनी योगेश कदम यांच्या आईच्या नावाने कांदिवलीतील सावली डान्सबार सुरू असल्याचा आरोप केला आहे. तसेच परब यांनी योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
