Ambadas Danve: आदित्य ठाकरेंच्या गाडीवर शिंदे गटातील आमदारांच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aaditya Thackeray

Ambadas Danve: आदित्य ठाकरेंच्या गाडीवर शिंदे गटातील आमदारांच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला

Aaditya Thackeray: युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर मंगळवारी रात्री हल्ला झाला होता. हा हल्ला शिंदे गटातील आमदारांच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांचे कार्यकर्ते असल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे. तर भिमशक्ती-शिवशक्ती एकत्र येऊ नये म्हणून कारस्थान केलं जात आहेत.

सरकारकडून आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे. तसेच सुरक्षेत तैनात असलेल्या पोलिस आधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी देखील अंबादास दानवे यांनी केली.

शिवसेना आमदार आदित्य ठाकरे हे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. महालगावातमध्ये शिवसंवाद यात्रा आणि रमाबाईंची मिरवणूक एकाच वेळी निघाल्याने एकच गोंधळ उडाला.

माता रमाई यांची जयंती असल्याने औरंगाबादमध्ये मिरवणूक सुरू होती. मिरवणूक आणि सभा एकाच वेळी एकाच ठिकाणी आल्याने गोंधळ निर्माण झाला.

यावेळी डीजेचा आवाज कमी करायला लावला आणि मिरवणूक थांबवल्यामुळे हा राडा झाला. तर काही जणांनी आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याचेही समोर आले आहे.

टॅग्स :Aditya ThackerayShiv Sena