

Dark rain clouds over Maharashtra as monsoon intensifies, bringing heavy rainfall alerts
esakal
राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. बंगालच्या उत्तर-पश्चिम उपसागरात आणि लगतच्या उत्तर ओडिशा-पश्चिम बंगाल किनारपट्टीवर निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव अधिक तीव्र झाला आहे. याचा थेट परिणाम राज्यावर होणार असून हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.