

Maharashtra
esakal
पुणे/वैभववाडी: मॉन्सूनने शनिवारी गोव्याचा उर्वरित भाग व्यापत तळकोकणात प्रवेश केला. राज्यात मॉन्सूनची प्रगती पाच ते १५ जूनदरम्यान होत असते. यंदा सर्वसाधारण वेळेत मॉन्सून तळकोकणात दाखल झाला. दुसरीकडे बंगालच्या उपसागराकडून ईशान्येकडील राज्यांतही मॉन्सूनने प्रवेश केला. सिंधुदुर्गसह कोल्हापूर जिल्ह्याच्या अनेक भागांत जोरदार पाऊसही झाला.