Mumbai Pune Red Alert : राज्यात मान्सूनची दमदार वाटचाल ! पुढील ४ दिवस पावसाचे; मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांत रेड अलर्ट

Maharashtra monsoon : रायगडमधील भिरा येथे 200 मिमीपेक्षा जास्त, तर लोणावळ्यात 100 मिमी पावसाची नोंद. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाची तीव्रता वाढली. पूर, भूस्खलन आणि वाहतूक कोंडीचा धोका; नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा.
Increase in water level in Godavari river basin in Ramtirtha area.
Increase in water level in Godavari river basin in Ramtirtha area.

esakal

Updated on

महाराष्ट्रात मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून, पुढील चार ते पाच दिवस राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या कोकण, घाटमाथा आणि किनारपट्टी भागात पावसाचा जोर कायम आहे. आज पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण, किनारपट्टी आणि घाटमाथ्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उद्या पुणे आणि रायगड जिल्ह्यांना रेड अलर्ट तर इतर ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com