esakal | केंद्रीय संस्थाचा वापर करुन विरोधकांंचं दबावतंत्र - उद्धव ठाकरे
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackarey

केंद्रीय संस्थाचा वापर करुन विरोधकांंचं दबावतंत्र - उद्धव ठाकरे

sakal_logo
By
विनायक होगाडे

मुंबई: आज विधीमंडळाचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन पार पडलं. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसीय अधिवेशनातील अभूतपूर्व अशा गोंधळावर प्रतिक्रिया दिली.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कालचा घातलेला गोंधळ हा भाजपला कमी वाटला की काय आजही त्यांनी विधीमंडळाच्या दारात प्रतिविधानसभा भरवली. आम्हीही काही वेळा असे प्रकार सभागृहाच्या आतमध्ये वेलमध्ये केले आहेत. पण विरोधकांनी आज विधानसभा अध्यक्षांची परवानगी न घेता सभागृहाबाहेर माईकचा वापर केला. अशा प्रकारे विरोधीपक्षांनी लोकशाहीच्या या पवित्र मंदिराचा अपमान केला. या दोन दिवसांत समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न सरकारने केलाय. दोन दिवसांत अनेक बिलं मंजूर केली. ओबीसी आररक्षणासंदर्भात केंद्राकडून योग्य माहिती मिळाल्यास प्रश्न सुटू शकतो. आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय.

पुढे ते म्हणाले की, कालचा गोंधळ कमी होता की काय, आजही त्यांनी प्रति विधानसभा वगैरेचा घोळ घातला गेला. विधानसभा परिसरात काहीही करायचे म्हटल्यावर अध्यक्ष आणि सभापतींची परवानगी लागते. त्यामुळे त्यांच्या मान्यतेशिवाय काहीही करता येत नाही. याचाही त्यांना विसर पडलाय.

हेही वाचा: भन्नाट! 32 इंची Smart LED TV फक्त 4999 रुपयांत

अपक्ष आमदार रवी राणांनी देखील आज असभ्य वर्तन केलं. 12 जणांना जाणीवपूर्वक निलंबन केलं असा रवी राणांनी आरोप केलाय. त्यांना वाटतंय की विधानपरिषदेच्या जागा भरल्या जात नाहीत म्हणून 12 केलं. मात्र, तसं काही नाहीये. विधीमंडळांचं पावित्र्य राखणं गरजेचं होतं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, विधीमंडळ हा कुस्तीचा आखाडा नाहीये त्यामुळे त्याचं पावित्र्य राखणं गरजेचं आहे. कालचा प्रकार लज्जास्पद होता. एकप्रकारे ओबीसी समाजाबद्दलचा विरोधी पक्षांचा द्वेष उफाळून आला का? असा सवाल निर्माण होतोय. लोकशाही पद्धतीने कामकाज होऊ न देता गोंधळ घालणं चुकीचं होतं. यापुढेही मतंमतांतर असली तरी जनतेच्या स्वप्नाला तडा जाईल, असं वागू नका विरोधकांना विनंती आहे. पुढे ईडीच्या हस्तक्षेपा च्या प्रश्नावर ते म्हणाले की, विरोधक केंद्रीय संस्थाचा वापर करुन दबावतंत्र निर्माण करत आहेत.

loading image