Monsoon Session: अधिवेशनात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

MOnsoon Session
MOnsoon SessionSakal

पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रात 'गुजरात कॉन्ट्रॅक्ट मॉडेल' का?

खासगी कंपनी पोलीस भरती करणार असल्याचं समोर आलं. पण गुजरात कॉन्ट्रॅक्ट मॉडेल महाराष्ट्र का आणत आहोत? त्यांनी माघार घेतली ठीक आहे पण हे का? विरोधी पक्षाची २९३ प्रस्तावावर चर्चा सुरू झाली. आम्हाला टँकर द्यावे लागले मूळ प्रश्नावर चर्चा झाली पाहिजे की फक्त मंत्री कोण यावर चर्चा करायची. राज्यात ७२ टक्के पेरण्या झाल्या ३८ लाख हेक्टरवर पेरण्या बाकी आहेत.

विदर्भात अतिवृष्टी झाली असून अजून पंचनामे झालेले नाहीत. गेल्यावेळी पाऊस झाला यातील नुकसानग्रस्तांना मार्चमध्ये पैसे देणार होते अजून पैसे आलेले नाहीत. हे पैसे शेतकऱ्याला मिळणार आहेत. शेतकरी, युवकांवर चर्चा केली पाहिजे, नुसतं जाहिरातीत अडकून भाषण करायची काय? आमच्या समित्या अद्याप नियुक्त झालेल्या नाहीत. खुर्ची आणि पदाबद्दल चर्चा करू नका, सामान्य लोकांबद्दल चर्चा करा, अशा तिखट शब्दांत यावेळी रोहित पवार यांनी सरकारवर विधानसभेत टीका केली.

'शासन आपल्या दरी'च्या जाहिरातीवर ५२ कोटी रुपये खर्च 

रोहित पवार यांनी विधानसभेत 'शासन आपल्या दारी' मोहिमेवरुन सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी ७०० गाड्या बुक केल्या. ५२ कोटी रुपये शासन आपल्या दरी जाहिरातवर खर्च झाला. फक्त टिमकी वाजवण्यासाठी जाहिरातवर खर्च करत आहात हे पैसे विद्यार्थ्यांसाठी वापरले असते तर मानलं असतं, अशी माहिती देत पवार यांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

विधानपरिषदेचं आजच कामकाज संपलं

उद्या बुधवारी विशेष बैठक सकाळी १०.३० ते ११.४५ या वेळेत भरेल. या बैठकीत पुरवणी मागण्यांवर चर्चा घेण्यात येईल. सभागृहाची नियमित बैठक दुपारी १२ वाजता भरेल, असं सांगत विधानपरिषदेच्या सभापती निलम गोऱ्हे यांनी आजचं कामकाज संपलं असल्याची घोषणा केली.

'समृद्धी'वर आता १५ मिनिटांत रुग्णवाहिका येणार 

बस अपघातातील बस विदर्भ टूर्सची बस होती. बसनं तिसऱ्या लेनमधून चालायला हवं होतं. बस पहिल्या लेनमध्ये आली अन् दुभाजकाला धडकली. त्यात डिझेल टँकला धडक बसून पेट घेतला. यामध्ये २५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

या अपघातात ड्रायव्हरनं मद्यपान केलेलं अढळून आलं आहे. हे अपघात कमी कसे करता येतील याचे प्रयत्न सुरू आहेत. कुणाचं वाहन पंक्चर झालं, नादुरुस्त झालं तर महामार्गावर नंबर लावले आहेत. अनेक प्रवासी यासाठी कॉल सेंटरचा वापर करतात.

पंधरा मिनिटात रुग्णवाहिका येईल अशी व्यवस्था केली आहे. यासाठी १७ रुग्णवाहिका आहेत. गस्त घालणारी १४ वाहने आहेत. १३ क्रेन आहेत, स्पीडने वाहन चालवले आणि लेन बदलली तर ड्रायव्हरचं समुपदेशन केलं जातं.

समृध्दी महामार्गाचा पुढचा टप्पा ऑक्टोबरमध्ये होणार पूर्ण

समृद्धी महामार्गाच्या उर्वरित कामाची माहिती दादा भुसे यांनी दिलं. ते म्हणाले, समृध्दी महामार्गाचा पुढचा टप्पा ऑक्टोबरमध्ये पूर्ण होईल. अंतिम टप्पा मे २०२४ मध्ये पूर्ण करणार. हा रस्ता सुरू झाल्यापासून यावरुन ३३ लाख वाहनांनी प्रवास केला आहे. यावर आत्तापर्यंत ५३ गंभीर अपघात झाले, यात १०९ लोकांचे मृत्यू झाले आहेत. हे अपघात वाहनावरील नियंत्रण सुटणे, ड्राइव्हरला झोप लागणे, टायर फुटणे, मागून वाहन धडकणे अशा कारणांनी झाले आहेत. यामध्ये प्रमुख दोन मोठे अपघात झाले. एक बस अपघात आणि एक इर्टिगा कारचा अपघात.

पक्षांतर केलेल्या आमदारांना निधी देण्यासाठी पुरवणी मागण्या

विधान परिषद

अंबादास दानवे - पुरवण्या मागण्या या जनतेला नैराश्य आणण्या-या आहेत. या मागण्यांमुळं जनतेला कोणताही आधार मिळणार नाही. फक्त पक्षांतर केलेल्या आमदारांना निधी देण्याकरता या मागण्या केल्या आहेत. सत्ताधारी आमदारांना २५-५० कोटी निधी देण्यात आला आहे. परंतू एका बाजूशी एक आणि एका बाजूशी एक हे सरकारचं वागणं बरं नव्हं, अशा शब्दांत विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी म्हटलं.

आज हा महाराष्ट्र जातीय दंगलीमुळं होरपळतो आहे. या सगळ्या पुरवणी मागण्या राजकीय हेतूनं केलेल्या आहेत. विकासाच्या हेतून पुरवणी मागण्या होणं गरजेचं आहे. सरकार बदल्याच्या भावनेनं वागत आहे, एकांगीपणानं वागत आहे. "जुल्मपर वार कौन करेगा, जब मुजरीम ही बैठे सरकार में, जब भी उठी इनके खिलाफ आवाज, तेजी आई जुल्म और अत्याचार में" जेवढं बोलावं तेवढे अत्याचार असा कारभार या सरकारचा आहे, अशा शब्दांत दानवेंनी सरकारवर सडकून टीका केली.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी उठवली

विधानपरिषद लक्षवेधी

यंदाच्या गणेशोत्सवासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवायला कोणतीही बंदी नाही, मात्र या मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावातच करावं, असं आवाहन मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानपरिषदेत केलं. यासाठी कृत्रिम तलावांची पुरेशी सोय प्रशासनामार्फत करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर सरसकट बंदी घालू नये, यामुळं मूर्ती तयार करण्याच्या व्यवसायावर अवलंबून असलेल्यांना फटका बसत आहे, अशी मागणी शेकापचे जयंत पाटील यांनी लक्षवेधी सुचनेद्वारे केली होती, त्याला केसरकर उत्तर देत होते. मूर्तींवर वापरल्या जाणाऱ्या रंगांसंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येतील, असंही केसरकर यांनी यावेळी सांगितलं.

२०१९-२०-२१ मध्ये निधी वाटप हे सूत्र आहे तेच सुरू ठेवले आहे. अजित पवार यांचे विरोधकांना उत्तर

पुरवणी मागण्या मंजूर

विधानसभेत विरोधकांनी केला गदारोळ

आमदारांना निधीवाटपावरून आणि पुरवणी मागण्यांवरून सध्या विधानसभेच्या सभागृहात गोंधळ सुरू आहे. आमच्याकडे सावत्र भावाच्या दृष्टीने बघू नका असं म्हणत यशोमती ठाकूर यांनी सरकारला टोला लावला आहे.

यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्याला अजित पवारांनी उत्तर दिलं असून, "मी सावत्र भावाच्या दृष्टीने नाही तर सख्ख्या भावाच्या नात्याने ओवाळणी देतो" असं ते म्हणाले.

आम्ही कोणताही दुजाभाव करत नाही असंही अजित पवार सभागृहात म्हणाले आहेत.

...तर आपला जाहीर सत्कार करतो : अनिल परब

"सरकारी कर्मचाऱ्यांना हक्काचे घर मिळावे ही माझी मागणी आहे. निवृत्तीनंतर ते आपल्या कुंटुबियांना घेऊन मुंबईबाहेर टोकाला राहतात. हे प्रामाणिक कर्मचारी आहेत. म्हणून ते झोपडी उभारत नाहीत. वांद्रेतील शासकीय इमारती ६० वर्ष जुन्या असून आता राहण्या योग्य नाहीत. या शासकीय कर्मचार्यांना हक्काची घरं मिळावी यासाठी आम्ही आंदोलनं केली वेळ प्रसंगी जेलही भोगले आहे. विलासराव मुख्यमंत्री असताना त्या पुर्नविकासासाठी जागा शोधण्याचे ठरले होते."

"आम्हाला फुकट घर नको, बीडीडी चाळी प्रमाणे आमच्याकडून पैसे घ्या आणि घर द्या. मी मंत्री असताना यासाठी जागा मान्य केली. मात्र दुर्दैवने सरकार कोसळले. शेवटच्या कॅबिनेटमध्ये मी भांडून घेतलेला निर्णय नव्या सरकारच्या मंत्र्यांनी रद्द केला. आता ९२ एकरातील ३० एकरचा भुखंड हायकोर्टाला दिला. आपण हा निर्णय घ्या मी आपला माझ्या मतदारसंघात आपला जाहीर सत्कार घेतो." असं परब म्हणाले आहेत.

अनिल परब

सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे. तो निर्णय देताना काही गाईडलाईन दिल्या आहेत. त्यामुळे एक गोष्ट नक्की आहे की १६ आमदारांना अपात्र घोषित करावेच लागेल. सध्या विधानसभा अध्यक्षांनी वेळकाढुपणाची भूमिका घेतलेली आहे. म्हणून पुन्हा मुदत वाढ मागितली आहे. आम्ही पुन्हा कोर्टात जाऊ. लवकरच निर्णय येईल असं अनिल परब म्हणाले आहेत.

मिठी नदी प्रकरणी SIT स्थापन करण्याची मागणी आम्हीसुद्धा केली होती. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी. जो गाळ काढला तो कोणाच्या खिशात गेला त्यासाठी मागणी केली होती. पण ज्यांची नावे समोर येतील त्यांच्यावर कारवाई होईल का? असा प्रश्न परबांनी यावेळी उपस्थित केला.

आपलं उद्योग खातं फार मागे आहे. मला वाटत नाही की, हे लोकं श्वेतपत्रिका काढतील. पोलिस गे सरकारचे डोळे आहेत आणि जर डोळे बनावट असतील तर सरकार कसं काम करेल. प्रशासन जुमानत नाही आहे. महापालिका अस्तित्वात नाही आहे. सर्व रामभरोसे चालले आहे म्हणूण पाणी साचणे आणि खड्डे असे प्रश्न आहेत. मला वाटत नाही कोणावर कारवाई होईल असंही परब म्हणाले.

आमदार अपात्रतेचा मुद्दा पुन्हा तापणार

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे विधानसभा अध्यक्षांकडून अवलोकन

१६ आमदारांच्या अपात्रतेबाबत दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे न्यायालयाने आदेश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाबाबत विधीमंडळाकडून कायदेशीर बाबींची तपासणी करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाची मुदत शुक्रवारी संपणार आहे. विधीमंडळाकडून सर्वोच्च न्यायालयाला अद्याप लेखी उत्तर देण्यात आलेले नाही.

उपसभापती निलम गोऱ्हे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यात तु तु मैं मैं.....

निलम गोऱ्हे - नेमका प्रश्न विचारा

अंबादास दानवे - एका प्रश्नसाठी तुम्ही पाऊणतास देता मग मला का नाही? मला वेळ मिळू द्या

निलम गोऱ्हे - तुम्ही बोला परंतु एवढा वेळ नाही

अंबादास दानवें - विरोधी पक्षनेते यांचा काही अधिकार आहे की नाही?

मिठी नदीच्या गाळ प्रकरणी एसआयटी चौकशी

  • मिठी नदीच्या गाळ प्रकरणी एसआयटी चौकशी स्थापन करण्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केली.

  • साल 2005 पासून साल 2023 पर्यंत नदीचा सौंदर्यायासाठी किती खर्च झाला तसेच गाळ काढण्यावर किती खर्च झाला याबाबत एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येणार

  • आमदार प्रसाद लाड यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला सामंत यांचं उत्तर

मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्याच्या प्रकरणावरून सभागृहात खडाजंगी

  • मुंबईतील मिठी नदी आणि ओढ्यातील गाळ काढण्यात भ्रष्टाचार झाल्याचा विरोधकांचा आरोप

  • यावर उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करणार असल्याची उदय सामंत यांची घोषणा

  • संबंधित काम पालिका आणि MMRDA यांच्याकडे होते

  • मिठी नदीच्या रुंदीकरण व सौंदर्यीकरणावर ११६० कोटी खर्च झाले. याचे कंत्राटदार कोण? किती पैसे कुठे खर्च करण्यात आले? याबाबत उच्चस्तरीय चौकशी समितीद्वारे करण्यात येईल.

  • राज्य सरकार या प्रकरणात लक्ष घालून चौकशी करणार अशी घोषणा

मिठी नदी रुंदीकरण आणि सौंदर्यीकरणावरून अनिल परब आणि उदय सामंत यांच्यात खडाजंगी झाली. मंत्री सभागृहात खोटी माहिती देत आहेत. खोटी माहिती घेऊन मंत्री सभागृहात येतात. असं म्हणत अनिल परब यांनी उदय सामंत यांना डिवचलं आहे. तर आम्ही कोणतीही खोटी माहिती देत नाही. आम्हालाही सभागृहात चार-चार वर्षाचा अनुभव आहे असं उत्तर मंत्री उदय सामंत यांनी दिलं आहे.

मोठे उद्योग राज्याबाहेर गेल्याबाबत या अधिवेशनात निघणार श्वेतपत्रिका

  • उद्योग मंत्री उदय सामंत श्वेतपत्रिका सादर करणार

  • वेदांता, टाटा एअरबस सी २९५, सॅफ्रन व बल्क ड्रग पार्क हे मोठे उद्योग राज्याबाहेर कसे गेले? याबाबतची श्वेतपत्रिका सादर करण्यात येणार

  • विद्यमान सरकारमुळे वेदांता, टाटा एअरबस सी २९५, सॅफ्रन व बल्क ड्रग पार्क हे मोठे उद्योग राज्याबाहेर गेले असा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला होता आरोप

  • वेदांता, टाटा एअरबस सी २९५, सॅफ्रन व बल्क ड्रग पार्क हे मोठे उद्योग राज्याबाहेर गेले कसे त्यावंर श्वेत पत्रिका काढली जाणार असं ६ महिन्यांपूर्वी उद्योगमंत्री यांनी घोषित केले होते.

  • विधान परिषदेत उपस्थित प्रश्नाला उद्योग खात्याचे लेखी उत्तर

  • प्रश्न सभागृहात येताच मंत्री उदय सामंत वेदांता, टाटा एअरबस सी २९५, सॅफ्रन व बल्क ड्रग पार्क हे मोठे उद्योग राज्याबाहेर कसे गेले याची श्वेत पत्रिका सादर करणार आहेत

राज्यात केळी महामंडळासाठी ५० कोटीची तरतूद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यात केळी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य शासनाने घेतला आहे. या महामंडळाच्या माध्यमातून केळी पिकाबाबत संशोधन करण्यात येणार असून या महामंडळासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली. सदस्य संजय सावकारे यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या औचित्याच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी निवेदन केले.

अनिल परब यांचा केसरकरांना चिमटा

राज्यातील शिक्षणाधिकारी यांच्या विभागीय चौकशीबाबत अब्दुला खान दुरानी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी उत्तर दिलं खरं, मात्र उत्तरात समाधानी न झालेल्या आमदारांनी स्वतंत्र बैठक घेण्याची मागणी केली. त्यावर अनिल परब यांनी सूचना करताना केसरकर यांना चिमटा काढला.

ही बैठक गोवा-सिंधुदुर्ग येथे घेण्यात यावी. मागे देखील आपण काही आमदारांची त्या ठिकाणी व्यवस्था केली होती हे आम्हाला माहित आहे. आता आम्हालाही घेऊन जावा आणि आमच्याही शंकेचं निरासन करा असा चिमटा अनिल परब यांनी काढला.

नाना पटोले

"विधी मंडळ कमिटी बनल्या नाही. पहिल्यांदा आलेले आमदार कसे काम करणार? ते कसे शिकणार यावर समित्या बनवण्यात याव्यात" असं काँग्रेसचे नेते नाना पटोले म्हणाल्यानंतर अध्यक्षांनी त्यांना उत्तर दिलं आहे. "नाना मी समिती बनवतो, मग नाव बदलावी लागतात, लोकं इकडून तिकडे जातात. राजकीय बदल होत असल्याने समिती पुन्हा बनवावी लागते. पण याबाबत समिती स्थापन करू, आमदारांसाठी गरजेची आहे" असं विधानसभा अध्यक्ष म्हणाले आहेत.

अतुल भातखळकर

जो कोणी कायदा हातात घेईल त्यावर कारवाई होईल. भाजप मनसे कधीच जवळ आला नव्हते. उद्धव ठाकरेंनी उगाच श्रेय घेऊ नये. उद्धव ठाकरे हे अकर्तुत्व माणूस आहेत अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली.

गुलाबराव पाटील, पालकमंत्री

बुलढाण्यात अपघात प्रकरणी मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो. ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याची माहिती असून सुदैवाने केवळ २ जण जखमी झालेत असं ते म्हणाले त्याचबरोबर खेकडा हा गुणकारी आहे… तो वेळीच संभाळला असता तर धरण फुटल नसतं असं ते उद्धव ठाकरे यांच्यावर बोलताना म्हणाले आहेत.

यासारखं दुसरं दुर्दैव नाही; धनंजय मुंडेंची विरोधकांवर टीका

सरकार उत्तर द्यायला उपस्थितीत राहिलं की विरोधी बाकावर एक सदस्य सोडून कोणीही उपस्थितीत राहात नाही. यासारखं दुर्दैव दुसर काही नाही. मी अनेक वर्ष या सभागृहाचा सदस्य राहिलोय पण हे चित्र मी कधीच पाहिले नाही. केवळ टीका करण्यासाठीच विरोधक सभागृहात हजर राहतात, असा आरोपही धनंजय मुंडे यांनी केला.

मणिपूर महिला अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आंदोलन

मणिपूरमधील महिला अत्याचाराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने नेते मौन निषेध आंदोलन करणार आहेत. मंत्रालया शेजारील गांधी पुतळ्याच्या ठिकाणी आंदोलन करणार असून या आंदोलनात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

रोहित पवार

कामगारांना शासनाच्या माध्यमातून जे अन्न दिले जाते त्यात गैरव्यवाहार सुरु आहे. १०० लोक असतील तर १००० लोक दाखवतात. सरकारने या बाबतीत एक निर्णय घेतला आहे त्याचं आम्ही स्वागत करतो. शिवभोजन थाळी चांगली योजना आहे. काही सेंटवर कदाचित चुकीच्या गोष्टी घडल्या असतील पण योजना बंद न करता काही करता येईल का हे पहावं असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं आहे.

मुंबई पोलिसात ही कंत्राटी भरती करणार हे चुकीचं आहे. हे लोकांसाठी आणि पोलिसांसाठी घातक आहे. राज्य सरकार अग्नीवीरचा छोटा भाऊ करतोय का? कंत्राटदाराला सरकार मोठं करत आहे का? हा प्रश्न निर्माण झाला असून आम्ही याचा निषेध करतो. असं मत रोहित पवार यांनी कंत्राटी पोलीस भरतीच्या निमित्ताने व्यक्त केली आहे.

"अमित ठाकरे यांची वेगळी स्टाईल आहे. त्यांनी अशा गोष्टींच समर्थन कस केलं माहित नाही. तोडफोड करणे ही जुनी पद्धत होती पण आता हे करण चुकीचं आहे. अजित पवार मुख्यमंत्री झाले तर पुतण्या म्हणून मला आनंदच आहे. पण त्यांचे आमदार करत असलेल्या ट्विट आणि पोस्टरमुळेच दादा अडचणीत येतील. राज्य आणि देशातील भाजप नेत्यांना आपल्या लोकांवर विश्वास नाही. त्यामुळे पक्ष फोडणे घर फोडणे सुरू आहे" असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं आहे.

परिषदेत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून उत्तर

राज्यातील शेतकरी प्रश्नावर विविध मुद्द्यावर कृषीमंत्री धनंजय मुंडे उत्तर देत आहेत.

भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून सरकारला घरचा आहेर

"आम्ही तीन तीन जिल्ह्यातून निवडून येतो. आम्हाला उशीर झाला तर आम्ही टॅक्सी करून येतो. मात्र, सरकारचे मंत्री, अधिकारी वेळेत येत नाहीत. आम्ही काय गोट्या खेळायला येतो का? आपण अधिकारी-मंत्री यांना समज द्यायला हवी." असं सुरेश धस विधानपरिषदेत बोलताना म्हणाले आहेत. विधानपरिषदेचे काम सुरू झाले तरी अधिकारी आणि सरकारमधील मंत्री हजर न झाल्यामुळे ते आक्रमक झाले होते.

त्यानंतर आम्ही मंत्री आणि अधिकाऱ्यांना समज देऊ असं तालिका सभापतींनी सांगितलं आहे.

विधानपरिषदेचे कामकाज सुरू

राज्यभर अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीचा मुद्दा परिषदेत उपस्थित करण्यात आला आहे.

अधिवेशनाचा आज सातवा दिवस

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज सातवा दिवस आहे. पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांनावर केलेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ काल विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन केले होते. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विधानभवन परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन केले होते. कर्जत जामखेड मतदारसंघातील एमआयडीसी सरकारने थांबवल्याचा आरोप त्यांचा आहे. या एमआयडीसीला मंजुरी मिळाली आणि माझ्या मतदारसंघातील तरूणांना रोजगार मिळावा यासाठी त्यांनी हे आंदोलन केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com