Monsoon Session : मी नवीन प्लेअर, संभाळून घ्या; मंगलप्रभात लोढांची विरोधकांना साद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंगलप्रभात लोढा

Monsoon Session : मी नवीन प्लेअर, संभाळून घ्या; मंगलप्रभात लोढांची विरोधकांना साद

Mangalprabhat Lodha : विधीमंडळ अधिवेशनाच्या तोंडावर नव्याने सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. यामुळे नव्याने खात्याच पदभार स्वीकरलेल्या मंत्र्यांना अभ्यासासाठी पाहिजे असा वेळ मिळालाच नाही. यामुळे अनेक मंत्र्यांची विरोधकांकडून उपस्थित करण्यात येणाऱ्या प्रश्नांना उत्तरं देताना दमछाक होत असल्याचे दिसून येत आहे. असाच काहीसा प्रकार मंगलप्रभात लोढा यांच्यासोबत घडला आहे. यावेळी चक्क त्यांनी विरोधकांना साद घालत 'मी नवीन प्लेअर जरा संभाळून घ्या' असे म्हटले.

हेही वाचा: Suicide Bomber : ISIS च्या दहशतवाद्याला रशियात अटक, भारतातील बडा नेता होता टार्गेट

"शासनाकडे नोंदणी केलेल्या बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासंबंधी एखादी पॉलीस शासन विचारी आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. अनेकदा जनगणनेचे काम अनेकदा शिक्षकांवर अतिरिक्त बोजा म्हणून लादले जाते. त्याऐवजी या कामासाठी या बेरोजगारांना शासन समाविष्ट करून घेणार का? या संदर्भात एखाद्या पॉलिसीचा शासन विचार करणार आहे का? असे विचारण्यात आले. त्यावर लोढा यांनी अतिशय मिश्किलपणे वरील साद घातली आहे.

हेही वाचा: MNS : शर्मिला ठाकरेंच्या 'त्या' विधानानंतर राज ठाकरे ॲक्शन मोडवर

लोढा म्हणाले की, "सभापती महोदया, एक तर मी नवीन प्लेयर आहे, त्यात मला ओपनिंगला उभे केले आहे आणि माझ्यावर बाऊन्सर वर बाऊन्सर टाकले जात आहेत. आता तरी थांबा कारण त्या प्रश्नाचा याच्याशी काहीही संबंध नाही" मंगलप्रभात लोढा यांच्या या उत्तराने सभागृहात एकच हशा पिकला. "तुमच्या सर्व प्रश्नांवर मी सविस्तर उत्तर देईन असे ते म्हणाले. दहापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असलेल्या खाजगी आस्थापनांनी कौशल्य विभागाच्या पोर्टलवर नोंदणी करणं बंधनकारक आहे" असे उत्तरही त्यांनी दिले.

Web Title: Maharashtra Monsoon Session Bjp Minister Mangal Prabhat Lodha Says I Am New Player

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..