Maharashtra Rain Update I पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार, हवामान खात्याचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

heavy rain in maharashtra upcoming 5 days

दोन ते तीन दिवसांपूर्वी राज्यात कोकणातील काही जिल्ह्यांना अलर्ट आणि विदर्भात येलो अलर्ट देण्यात आला होता.

पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार, हवामान खात्याचा इशारा

मागील महिन्याच्या मध्यापासून महाराष्ट्रातील काही भागांत तुरळक पावसाच्या सरी सुरु आहेत. कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील भागांत पावसाची रिपरिप सुरू आहे. यंदा जून महिन्यात दरवर्षीच्या सरासरीपेक्षा पावसाची नोंद कमी झाली असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मागील दोन ते तीन दिवसांपूर्वी राज्यात कोकणातील काही जिल्ह्यांना अलर्ट आणि विदर्भात येलो अलर्ट देण्यात आला होता. (heavy rain in maharashtra upcoming 5 days)

हेही वाचा: शिवसेनेचा व्हिप धुडकावत शिंदे गटाचा राहुल नार्वेकरांना पाठिंबा

दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. दरम्यान, या पावसाच्या सरी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत कोसळणार आहे. त्यामुळे प्रशासनाने या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. २६ जूनपासून पावसाला सुरुवात होईल अशी माहिती मिळत होती. त्याप्रमाणे काही ठिकाणी पावसाने सुरुवात केली. मात्र कोकणचा काही प्रदेश वगळता राज्यातील इतर भागात पावसाचा जोर कमी असल्याचे दिसत आहे.

जुलै महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस पडेल अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. जून महिन्यातील पावसाचा संभाव्य अंदाजही वर्तवण्यात आला होता. यामध्ये सामान्य किंवा सामान्य पाऊस भारताच्या वायव्य आणि मध्य भारतात पडेल तसेच असाच पाऊस उत्तर द्वीपकल्प, पूर्वेचा काही भाग आणि ईशान्येकडील काही भागांमध्येही होण्याची शक्यता होती.

हेही वाचा: देशानं या घटनेची नोंद घेतली; बंडावर मुख्यमंत्री शिंदे स्पष्टच बोलले!

गेल्या वर्षीच्या तुलनते यंदा पाऊसमान चांगले असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. त्यानुसार, मागील दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागांत तुरळक पावसाच्या सरी सुरु आहेत. मात्र या पावसाचा जोर कोकणातील प्रदेशावर अधिक असल्याचे चित्र आहे. कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील भागांत पावसाची रिपरिप सुरू आहे. यावर्षी मृग नक्षत्र कोराडाच गेला असल्याने शेतकरी चिंतेत आहे. मात्र आता पावसाने जोरदार एंट्री करावी म्हणजे शेतीकामांना वेग येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Maharashtra Monsoon Upcoming 5 Day Heavy Rainfall In Konkan Vidarbha Marathwada

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..