
मॉन्सून आज कोकणसह मुंबईत दाखल झाल्यामुळे मुंबई उपनगरसह राज्यातील अनेक शहरांमध्ये मोठा पाऊस कोसळत आहे . पुढील 4 दिवस मुंबई मध्ये पाऊस कायम राहील मात्र त्याची तीव्रता काहीशी कमी होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे. पुणे शहरात आज सकाळपासून ढग दाटून आले होते आणि त्यानंतर आज पुणे शहरात संतधार पावसाला सुरुवात झाली. मुंबई, पुणे नंतर सोलापुरातही मान्सून दाखल झाला आहे.