esakal | राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा; मुंबईत ऑरेंज अलर्ट
sakal

बोलून बातमी शोधा

heavy rainfall

राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा; मुंबईत ऑरेंज अलर्ट

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : राज्यात (Maharashtra) 5 ते 9 सप्टेंबर दरम्यान गडगडाटासह मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचे इशारे (heavy rainfall) आज प्रादेशिक हवामान विभागाने (whether update) पुन्हा दिले आहेत. मुंबईत (Mumbai) 7 आणि 8 सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून ऑरेंज अलर्ट (orange alert) देण्यात आला आहे. कोकणासह मराठवाडा,मध्य महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव सर्वदूर असेल.

हेही वाचा: मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या ४९६ नव्या रुग्णांची भर; २ जणांचा मृत्यू

कोकण, मध्य महाराष्ट्रात 7 आणि 8 सप्टेंबरला तिव्रता जास्त असेल. त्यासह मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे सातारा, रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यासाठी हवामान विभागाने ऑरेंज इशारा दिला आहे. मुंबईत आज पावसाने हजेरी लावली. काही परिसरात पावसाच्या मुसळधार सरी कोसळल्या. आज मुंबई शहर 14.17 मिमी ,पूर्व उपनगर 20.86 मिमी आणि पश्चिम उपनगर 28.08 मिमी पावसाची नोंद झाली. मुंबईत आतापर्यंत 84.40 टक्के पावसाची नोंद झाली.

loading image
go to top