monsoon updateesakal
महाराष्ट्र बातम्या
Monsoon Update : राज्यातील काही भागांत पावसाची उघडीप पण आज 'या' 12 जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी; पुढील दोन दिवस कसे असेल हवामान?
Weather Update : कोकण-गोव्यात काही ठिकाणी,तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम, तर काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.
मागील तीन दिवसांपासून राज्यातील काही भागांत पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्रातल्या काही भागांना मुसळधार पावसाने हजेरी लावली तर मराठवाडा आणि विदर्भात पावसाने उघडीप दिली होती पण आता पुन्हा हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, आज 12 जिल्ह्यांत येलो अलर्ट जारी केला आहे.