esakal | मोठी बातमी! राज्य लोकसेवा आयोगातील 15 हजार 515 रिक्त पदे भरण्यास मंजुरी
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

राज्य लोकसेवा आयोगातील 15 हजार 515 रिक्त पदे भरण्यास मंजुरी

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

मुंबई- पुण्यातील स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊनही नोकरी न लागल्याने आत्महत्या केली होती. त्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाच्या सर्व जागा तत्काळ भरण्याची मागणी सर्व स्तरातून केली जात होती. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 31 जुलैपर्यंत राज्य लोकसेवा आयोगाच्या सर्व जागा भरणार असल्याची घोषणा केली होती. याप्रकरणी सुमारे १५ हजार ५१५ रिक्त पदे भरण्यास मंजुरी मिळाल्याची माहिती मिळत आहेत. (maharashtra mpsc will fill 15515 posts said ajit pawar student Swapnil Lonkar Suicide)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. राज्य लोकसेवा आयोगाकडून सुमारे १५ हजार ५१५ रिक्त पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे. आरक्षणानुसार ही पदे भरली जातील. या निर्णयांवर तातडीने कार्यवाहीच्या सूचना केल्या आहेत, असं पवार म्हणाले आहेत. अजित पवार यांच्या घोषणेमुळे एमपीएससी विद्यार्थांना दिलासा मिळणार आहे. कोरोना महामारीमुळे राज्य लोकसेवा आयोगाच्या जागा भरल्या गेल्या नव्हता. पण, आता या जागा भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: ग्राहकांना फोन करणं पडणार महागात; प्रत्येक कॉलसाठी 10 हजार दंड

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरी नसल्यामुळे एका २४ वर्षाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उडली. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास स्वप्निल सुनील लोणकर या तरूणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वप्निल याच्या आत्महत्येने सर्वत्र शोक व्यक्त केला जात असून विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. या मुद्द्यावर विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात चर्चा झाली. या चर्चेला उत्तर देताना MPSCच्या सर्व रिक्त जागा ३१ जुलै २०२१ पर्यंत भरण्यात येतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

loading image