esakal | ग्राहकांना सतत फोन करणं पडणार महागात; प्रत्येक CALL, SMSला 10 हजार दंड
sakal

बोलून बातमी शोधा

calls

दूरसंचार विभाग (The Department of Telecom) ग्राहकांना वारंवार येणाऱ्या त्रासदायक कॉल्सवर निर्बंध आणण्याच्या तयारीत आहे. यानुसार 50 वेळा उल्लंघन केल्यानंतर अशा कॉल करणाऱ्यांना पुढील प्रत्येक कॉल, एसएमएससाठी 10 हजार रुपयांचा दंड लावण्याचा प्रस्ताव आहे.

ग्राहकांना फोन करणं पडणार महागात; प्रत्येक कॉलसाठी 10 हजार दंड

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- दूरसंचार विभाग (The Department of Telecom) ग्राहकांना वारंवार येणाऱ्या त्रासदायक कॉल्सवर निर्बंध आणण्याच्या तयारीत आहे. यानुसार 50 वेळा उल्लंघन केल्यानंतर अशा कॉल करणाऱ्यांना पुढील प्रत्येक कॉल, एसएमएससाठी 10 हजार रुपयांचा दंड लावण्याचा प्रस्ताव आहे. सूत्रांकडून ही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी त्रासदायक ठरणाऱ्या कॉल्स आणि एसएमएसना आळा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डिओटीने दंडाचा स्लॅब निर्धारित केला आहे. (Department of Telecom for 10000 fine on every call SMS by pesky callers after 50 violations)

प्रस्तावानुसार 10 वेळा नियमांचे उल्लंघन झाल्यास 1 हजार रुपये, 10 ते 50 वेळा उल्लंघन केल्यास 5 हजार रुपये आणि 50 पेक्षा जास्तवेळा नियमांचे उल्लंघन केल्यास 10 हजार रुपये दंड लावण्याचा प्रस्ताव आहे. सध्याच्या टेलिकॉम कमर्शियल कम्युनिकेशन्स ग्राहक प्राधान्यता नियम, 2018 (TCCCPR) नुसार, 0 ते 100, 100 ते 1000 आणि 1000 पेक्षा जास्तीचे स्लॅब आहेत.

हेही वाचा: निर्बंध बस झाले, आता कोरोनासोबत जगायला शिका- बोरिस जॉन्सन

डीओटीच्या डीआययूच्या उपकरणाच्या माध्यमातून उल्लंघनाचा तपास होणार आहे. डीआययू संदिग्ध फोन नंबरवर सिस्टिम जनरेटेड मेसेज पाठवण्यात येतील. अशा काही मोबाईल क्रमाकांना डिस्कनेक्ट करण्यात येईल आणि यासंबंधित आयएमईआयला संदिग्ध सूचीत टाकण्यात येईल. संदिग्ध यादीमध्ये टाकण्यात आलेल्या आयएमईआयला 30 दिवसांच्या कालावधीत कसलाही कॉल, एसएमएस किंवा इंटरनेटच्या वापराला मंजुरी नसेल.

हेही वाचा: Corona Update: 111 दिवसानंतर देशात सर्वात कमी नवे रुग्ण

दोन वर्षांपर्यंत बंदी

त्रासदायक कॉलरने आपले उपकरण बदलले, तर त्याचे नवे डिव्हाईस आयएमईआयचा नंबर संदिग्ध सूचीमध्ये टाकण्यात येईल. कॉलरने आपला नंबर व्हेरिफिकेशन केला नाही, तर उपकरणाचा वापर मर्यादीत करण्यात येईल. महिन्याभरात केवळ 20 कॉल आणि 20 मेसेज कॉलरला करता येतील. शिवाय पुढेही उल्लंघन सुरुच राहिले तर टेलिकॉम सेवा घेण्यासाठी देण्यात आलेली ओळख आणि पत्ता 2 वर्षांसाठी ब्लॉक करण्यात येईल.

loading image