

Sharad Pawar-led NCP faction faces a major electoral setback as municipal election results show zero seats in 18 corporations across Maharashtra.
esakal
शुक्रवारी राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निकालात सत्ताधारी महायुतीने (भाजप-शिंदे सेना-अजित पवार राष्ट्रवादी) प्रचंड यश मिळवले असून, विरोधकांना मोठा फटका बसला आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) साठी हे निकाल धक्कादायक ठरले आहेत. एकेकाळी राज्याच्या राजकारणात 'किंगमेकर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गटाला १८ महानगरपालिकांमध्ये अपेक्षित यश मिळाले नाही. अनेक शहरांत तर पक्षाला खातेही उघडता आले नाही, तर काही ठिकाणी तुटपुंज्या जागा मिळाल्या.