Maharashtra Politics : मनसेकडून जितेंद्र आव्हाडांना बालदिनाच्या 'मोक्कार' शुभेच्छा; म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jitendra Awhad
Maharashtra Politics : मनसेकडून जितेंद्र आव्हाडांना बालदिनाच्या 'मोक्कार' शुभेच्छा; म्हणाले...

Maharashtra Politics : मनसेकडून जितेंद्र आव्हाडांना बालदिनाच्या 'मोक्कार' शुभेच्छा; म्हणाले...

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर काल विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतऱ आता विविध पक्षातल्या नेत्यांकडून प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. यानंतर आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचाही निर्णय घेतला असून यावरुन मनसेने त्यांना टोला लगावला आहे.

मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी जितेंद्र आव्हाडांविषयी ट्वीट करत त्यांना टोला लगावला आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणाले, "विधानसभा अध्यक्षांकडे नाही तर ट्विटरवर आपल्या आमदारकीचा राजीनामा देणाऱ्या लहान मुलांना बालदिनाच्या मोक्कार शुभेच्छा."

हेही वाचा - मामाच्या जमिनीवरून सावकाराला पळविणारा 'डेबू' कसा बनला गाडगेबाबा.....

ठाण्यातल्या मॉलमध्ये हरहर महादेव चित्रपटावरुन केलेल्या मारहाणीमुळे आव्हाडांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची जामीनावर सुटका झाली होती. त्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत एका कार्यक्रमातही दिसले. याच कार्यक्रमानंतर आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

त्याविषयी आपल्या भावना व्यक्त करताना आव्हाडांनी आपण राजीनामा देत असल्याचं ट्वीट केलं होतं. आपल्या ट्वीटमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणतात, "पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही ३५४. मी ह्या पोलिसी अत्याचाराविरुद्ध लढणार. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे. लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत"