दोनशेपेक्षा जास्त ग्रामपंचायतींचा प्रचार थंडावणार, रविवारी मतदान; आज निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस

जिल्‍ह्यातील दोनशेवर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचार तोफा उद्या. (ता.३) थंडावणार आहे. रविवारी मतदान होणार असल्याने शुक्रवारी पाच वाजतानंतर जाहीर प्रचार करता येणार नाही.
Grampanchayat Election
Grampanchayat Electionesakal
Updated on

Grampanchayat Election: जिल्‍ह्यातील दोनशेवर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचार तोफा उद्या. (ता.३) थंडावणार आहे. रविवारी मतदान होणार असल्याने शुक्रवारी पाच वाजतानंतर जाहीर प्रचार करता येणार नाही. या निवडणुकीत अनेक उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे.

११३ ईव्हीएम मशिन सील

तालुक्यातील २६ गट ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी उमेदवारांना चिन्ह वाटप होतात सुरू झाली होती. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या निवडणुकांचा धुराळा सायंकाळी शमणार आहे. लोकनियुक्त सरपंच पदांच्या २६ जागेसाठी ७१ उमेदवार तर २१४ सदस्य पदांच्या जागेसाठी आपले भाग्य अजमाविण्यासाठी ४८९ उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात ताल ठोकून आहेत. यातील १२ सदस्यांच्या बिनविरोध झालेल्या जागा वगळता इतर उमेदवारांचे भाग्य ५ तारखेला होणाऱ्या मतदानाच्या रूपातून मतदान यंत्रामध्ये सील होणार आहे.

मतदान सुरळीत पार पडावे, यासाठी निवडणूक अधिकारी मलिक विराणी व नायब तहसीलदार संदीप डाबेराव यांनी निवडणूक यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामकाजाविषयीचे मार्गदर्शन केले आहे. तसेच त्यांना दोनदा प्रशिक्षण दिले आहे.

वेलतूर परिसरात काट्याची लढत

परिसरातील अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणूका ५ नोव्हेंबरला होऊ घातल्या आहेत. सरपंचपदासाठीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांमध्ये काट्याची लढत होण्याची चिन्ह आहे. मतदारांना आकृष्ट करण्यासाठी उमेदवार जंगी मेजवानी देत आहेत.

वेलतूर, शिकारपूर, खैरलांजी, गोठणगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. यानिमित्ताने जुने नवे गट आमनेसामने आले आहेत. गटा-तटाच्या राजकारणाने निवडणुकीत रंगत आली आहे. अनेकांसाठी ही निवडणूक आरपारची ठरत आहे. जुने अनुभवी उमेदवार विरुद्ध नवख्या उमेदवारांनी बहुतेक ग्रामपंचायतीमध्ये आपली उमेदवारी दाखल करून निवडणुकीचा माहोल रंजक केला आहे. सोबत प्रचारासाठी फेसबुक, इन्सटा, व्हॉट्स ॲप सारखी डिजिटल माध्यमे वापरली जात आहेत.

वेलतूरात तर विधानसभा व लोकसभा निवडणूक प्रचारागत निवडणुकीचा प्रचार,रॅली व प्रचार सभा घेतल्या जात आहेत. त्यातल्या नियमित चालणाऱ्या जेवणावळीच्या पगंतीची चर्चा तालुक्यात चांगलीच आहे. यात खवय्यांची मात्र चागंलीच चांदी आहे. आज मटण, उद्या चिकन परवा फिश सोबतीला पनीरही आहे बरं असेही सांगत पगंतीचे आमंत्रण देण्यात ते विसरत नाही. आमंत्रित करताना मतदार नाराज होऊ नये याची पूर्ण काळजी घेतली जात आहे हे विशेष.

वेलतूरात राष्ट्रीय काँग्रेसच्या दोन गटासह भाजपच्या गटात मुख्य लढत असून काही समाजाच्या एकत्रिकरणातून उभे राहणारे उमेदवार त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतात. काँग्रेसचे मनोज तितरमारे याच्या राजकीय ताकदीची ही परीक्षा घेणारी निवडणूक ठरण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत. जातीय समीकरणातून उभे ठाकलेले हे उमेदवार निवडणूक रिंगणात खरच कमाल करतील काय? असाही सवाल आता होऊ लागला आहे.(Latest Marathi News)

१०३ मतदान यंत्रे सील

२६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १०३ मतदान यंत्रे सील करण्यात आली आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी मलिक विराणी, नायब तहसीलदार संदीप डाबेराव,नाझर जयसिंग राठोड, कारकून प्रमोद चौधरी,मनोज शास्त्रकार यांच्यासह निवडणूक निर्णय अधिकारी,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी,सरपंच व सदस्य पदांचे उमेदवार त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शनिवारी होणार मतदानाचे साहित्य वाटप

निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना चार तारखेला मतदान साहित्य वाटप केले जाणार आहे. निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ९३ पथक नियुक्त करण्यात आले असून एका पथकात पोलिस बलासह ५ जणांचा समावेश आहे. (Latest Marathi News)

Grampanchayat Election
Pune Fire News : पुण्याच्या रास्ता पेठेतील विद्यार्थींनींच्या वसतिगृहात आग; शैक्षणिक साहित्य, लाकडी सामान जळून खाक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.