

Ladki Bahin Yojana
esakal
महाराष्ट्रातील महिलांना मकर संक्रांतीच्या निमित्ताने लाडकी बहिण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या तीन हजार रुपयांच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. मात्र, या रकमेचे वितरण आता उशिरा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेस पक्षाने या प्रकरणी थेट राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली आहे. महानगरपालिका निवडणुकांनंतरच या योजनेच्या पैशांचे वाटप करण्यात यावे, अशी त्यांची मागणी आहे. मतदानाच्या दोन दिवस आधी महिलांना पैसे मिळाल्यास निवडणुकीवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असा युक्तिवाद काँग्रेसने केला आहे.