लहुजी साळवे जयंतीदिनी स्मारकाचे भूमिपूजन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

मुंबई - क्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन येत्या त्यांच्या जयंतीला व्हावे, अशा दृष्टीने स्मारकाचे काम पूर्ण करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पुणे महापालिका आयुक्तांना दिले. 

पुण्यातील संगमवाडी भागात वस्ताद लहुजी साळवे यांचे स्मारक करण्याविषयी आज बैठक झाली. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. ""वस्ताद लहुजींच्या कार्याची आणि संघर्षाची माहिती पुढील पिढीला झाली पाहिजे या दृष्टीने स्मारक बांधण्याचे नियोजन असावे, असे सांगून ते म्हणाले, स्मारकाचे बांधकाम दर्जेदार व उत्तम व्हावे. त्यांच्या येत्या जयंतीला स्मारकाचे भूमिपूजन व्हावे, अशा दृष्टीने हे काम गतीने करावे.'' या वेळी अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, स्मारक समितीचे अध्यक्ष अशोक लोखंडे, सचिव रामदास साळवे आदी उपस्थित होते.

Web Title: maharashtra news Lahuji Salve Monument