esakal | ध्वनिक्षेपक वापरात गणपतीत चार दिवस सूट 

बोलून बातमी शोधा

ध्वनिक्षेपक वापरात गणपतीत चार दिवस सूट }
ध्वनिक्षेपक वापरात गणपतीत चार दिवस सूट 
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - मुंबई शहर आणि जिल्ह्यात ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरण्याच्या मर्यादेतून सूट देण्याबाबतचे 15 दिवस मुंबई शहर जिल्हाधिकारी यांनी जाहीर केले आहेत. उद्यापासून सुरू होणारा गणपती उत्सव चार दिवस (दुसरा दिवस, पाचवा दिवस, गौरी विर्सजन व अनंत चतुर्दशी), नवरात्री उत्सव दोन दिवस (अष्टमी व नवमी) दिवाळी एक दिवस (लक्ष्मीपूजन), नाताळ एक दिवस, 31 डिसेंबर एक दिवस या दिवसांसाठी श्रोतृगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष या ठिकाणी ध्वनिवर्धक सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत वापरण्याची सूट असेल. 

ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरण्यासंदर्भात मा. उच्च न्यायालयाने ध्वनिप्रदूषणासंदर्भात दिलेले आदेश, ध्वनिप्रदूषण 2000 मधील नियम 3 व 4 चे पालन, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या ध्वनिप्रदूषण नियम 2000 च्या अधिसूचनेनुसार पालन करणे संबधितांवर बंधनकारक आहे.