Maharashtra News: भाजपचे नेते नरेंद्र मोदींनाच पुन्हा नेता निवडतील का ? पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल

Congress : चंद्राबाबु नायडु आणि नितीश कुमार यांच्या दोन मोठ्या घटक पक्षानी कॉंग्रेसबरोबर पुर्वी काम केले आहे | The two major constituent parties of Chandrababu Naidu and Nitish Kumar have worked with the Congress in the past
 भाजपचे नेते नरेंद्र मोदींनाच पुन्हा नेता निवडतील का ? पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल
Maharashtra News:sakal

Karhad News: देशातील जनतेने नरेंद्र मोदी यांच्या विरोधात स्पष्ट कौल दिलेला आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये मोदींना स्वतःच्या भाजपच्या पक्षाच्या ताकदीवर बहुमत मिळाले होते. यावेळी त्यांना त्या जागा मिळालेल्या नाहीत. नरेंद्र मोदींचा तो वैयक्तीक पराभव आहे.

भाजप सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र संघ आणि भाजपचे जेष्ठ नेते नरेंद्र मोदींनाच पुन्हा नेता निवडतील का ? हा माझ्या मनातील प्रश्न असुन ते दुसरा नेता निवडुन पर्यायी व्यवस्था होताना दिसत आहे का अशी शंका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केली. (Satara News)

 भाजपचे नेते नरेंद्र मोदींनाच पुन्हा नेता निवडतील का ? पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल
Satara Lok Sabha Result: तुतारीसारख्या दिसणाऱ्या चिन्हाने शशिकांत शिंदेचा केला घात...साताऱ्यात नेमकं काय घडलं?

लोकसभा निवडणुकीच्या निकालावर त्यांनी प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले, संसदीय लोकशाहीमध्ये आपल्या पक्षाची धोरणे राबवयाची असतील तर सत्तेत यायला लागते. सर्व पक्षातील लोकांना एकत्र येवुन आपल्याला पंतप्रधानपद मिळावे यासाठी पक्षांच्या दोन्ही बाजुकडुन केला जाईल. इंडिया आघाडी आणि एनडीएमध्ये फार मोठा फरक नसेल. चंद्राबाबु नायडु आणि नितीश कुमार यांच्या दोन मोठ्या घटक पक्षानी कॉंग्रेसबरोबर पुर्वी काम केले आहे.

नितीश कुमारे हे डाव्या विचाराचे होते. जर चंद्राबाबु यांना नितीश कुमार यांना निमंत्रण देण्याचा प्रयत्न करण्यामध्ये हरकत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात जसे झाले तसे केंद्रातही होईल. नरेंद्र मोदी आणि अमित शहा तो प्रयत्न करतील. आमच्यातील कोण फोडता येते आहे का याचाही ते प्रयत्न करतली. देशातील जनतेने नरेंद्र मोदी यांच्या विरोधात स्पष्ट कौल दिलेला आहे.(Modi VS Congress)

२०१४ आणि २०१९ मध्ये मोदींना स्वतःच्या भाजपच्या पक्षाच्या ताकदीवर बहुमत मिळाले होते. यावेळी त्यांना त्या मिळालेल्या नाहीत. नरेंद्र मोदींचा तो वैयक्तीक पराभव आहे. भाजप सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र संघ आणि भाजपचे जेष्ठ नेते नरेंद्र मोदींनाच पुन्हा नेता निवडतील का ? हा माझ्या मनातील प्रश्न असुन ते दुसरा नेता निवडुन पर्यायी व्यवस्था होताना दिसत आहे का याचीही माहिती घ्यावी लागणार आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सर्व घटकांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा चांगला समन्वय झाला. बुथ एजंटकडुनही चांगले काम झाले. कोणत्या पक्षाचा उमेदवार आहे हे पाहिले नाही. महाविकास आघाडी एकजीनसीपणाने लढली त्याचा हा कौल आहे. या निवडणुकीत पाच स्थानिक मुद्यावर आम्ही प्रचार केला. त्याला यश आले.

 भाजपचे नेते नरेंद्र मोदींनाच पुन्हा नेता निवडतील का ? पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल
Maharashtra Result 2024 : राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार? डॅमेज कंट्रोल करण्यासाठी भाजपची रणनीती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com