''सोशल मीडियावरील खोट्या माहितीमुळे महाराष्ट्रात दंगल'', सायबर सेलने बनविली ३६ पोस्टची यादी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

amravati violence

'सोशल मीडियावरील खोट्या माहितीमुळे दंगल', सायबर सेलने बनविली ३६ पोस्टची यादी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : गेल्या पाच दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील अमरावती (Amravati Violence), मालेगाव (Malegaon violence), नांदेड (Nanded Violence) या जिल्ह्यांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या. या घटनांसाठी सोशल मीडियावरील भडकाऊ पोस्ट आणि खोट्या बातम्या जबाबदार असल्याचे महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेल विभागाने (maharashtra cyber cell) गृह विभागाला सादर केलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे.

हेही वाचा: अमरावती हिंसाचार : भाजपच्या दोन माजी पालकमंत्र्यांसह १५ जणांना अटक

''अमरावती, मालेगाव आणि नांदेडमधील हिंसाचारासाठी सोशल मीडियावर खोट्या बातम्या जबाबदार होत्या. अशा ३६ पोस्टची सायबर सेल विभागाने यादी केली असून यामध्ये ट्विटर 25, फेसबुक सहा आणि इंस्टाग्रामवरील पाच पोस्टचा समावेश आहे. त्यामधून चुकीची माहिती पसरविण्यात आली आहे. या सर्व पोस्टची यादी एका अहवालामधून गृहविभागाला देण्यात आली आहे. याबाबत इंडिया टूडेने वृत्त दिले आहे.

त्रिपुरातील कथित घटनेच्या विरोधात अमरावतीमध्ये आंदोलन करण्यात आले. या रॅलीदरम्यान दगडफेक झाली. याच घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी काही हिंदूत्ववादी संघटना आणि भाजपने शहर बंदची हाक दिली होती. मात्र, या बंदला हिंसक वळण लागले. दुकानांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. त्यामुळे अमरावतीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच इंटरनेट सुविधा देखील बंद करण्यात आली आहे.

मालेगाव आणि नांदेडमध्ये देखील हिंसाचाराच्या घटना घडल्या असून याठिकाणी देखील संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सध्या याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून अमरावतीमध्ये अनेक भाजप नेत्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत जवळपास १८८ जणांना अटक करण्यात आली आहे.

loading image
go to top