अमरावती हिंसाचार : भाजपच्या दोन माजी पालकमंत्र्यांसह १५ जणांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP

अमरावती हिंसाचार : भाजपच्या दोन माजी पालकमंत्र्यांसह १५ जणांना अटक

sakal_logo
By
टीम ई सकाळ

अमरावती : शहर बंदला हिंसक वळण लागल्यानंतर अमरावतीमध्ये दंगल (Amravati Violence) उसळली. त्यामुळे सध्या अमरावती शहरात संचारबंदी असून पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केली आहे. आज भाजपचे माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता (Jagdish Gupta), माजी राज्यमंत्री प्रविण पोटे (Pravin Pote) यांच्या १५ जणांना अटक करण्यात आली आहे. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

हेही वाचा: अमरावती हिंसाचार : पोलिसांची मोठी कारवाई, भाजपच्या महापौरांसह तिघांना अटक

त्रिपुरा येथील कथित घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी अमरावतीमध्ये आंदोलन करण्यात आले. याच घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी काही हिंदूत्ववादी संघटना आणि भाजपने शहर बंदची हाक दिली होती. या बंदला हिंसक वळण लागले. यामध्ये दुकाने फोडण्यात आली. अनेक दुकानांची जाळपोळ करण्यात आली. तसेच काही ठिकाणी दगडफेक देखील झाली. त्यामुळे अमरावतीमध्ये चार दिवसांची संचारबंदी जाहीर करण्यात आली होती. तसेच कुठल्याही अफवा पसरू नये यासाठी इंटरनेट सुविधा देखील बंद ठेवण्यात आली आहे. आता भाजपचे माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता, माजी राज्यमंत्री प्रविण पोटे यांच्यासह १५ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये भाजप, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांचा समावेश आहे. सध्या सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात प्रक्रिया सुरू असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

भाजपचे माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता

भाजपचे माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता

भाजपचे माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे

भाजपचे माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे

यापूर्वीही भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडे यांच्यासह महापौर चेतन गावंडे यांना अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयात हजर केले असता जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसेच दुसऱ्या गटातील लोकांना देखील अटक करण्यात आली आहे.

loading image
go to top