Amritpal Singh News: खलिस्तानी अमृतपाल सिंह महाराष्ट्रात येण्याची शक्यता! पोलीस अलर्टवर...

Amritpal Singh News
Amritpal Singh News

Latest Marathi News: खलिस्तानी अमृतपाल सिंह प्रकरणी महाराष्ट्र पोलीस अलर्ट मोडवर आली आहे. नांदेड पोलिसांना सुरक्षा यंत्रणांच्या विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. नांदेडमध्ये येणाऱ्यांवर पोलिसांची कडक नजर असणार आहे. अमृतपाल सिंह फरार आहे. पंजाब पोलीस त्याच्या मागावर आहे.

अमृतपाल दुसऱ्या राज्यात जाऊ शकतो. त्यामुळे देशभरातील पोलीस देखील सतर्क झाले आहेत. 

महाराष्ट्र पोलीस अलर्ट मोडवर आहे. याप्रकरणी काही जिल्ह्यांना निर्देश देण्यात आले आहेत. नांदेड शहरात पंजाबमधून येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यापूर्वी पंजाबमध्ये काही खलिस्तानी अतिरेकी पकडले गेले होते.

त्यामुळे अमृतपाल आणि त्याचे समर्थक नांदेडला येऊ शकतात. या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात अलर्ट राहीर करण्यात आला आहे. बाहेरून जे लोक नांदेडमध्ये येतात त्यांच्यावर पोलिस लक्ष ठेऊन आहेत. 

पंजाब पोलीस शनिवारपासून अमृतपालचा शोध घेत आहेत. मात्र तो पोलिसांना चकवा देत आहे. हे प्रकरण आता पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयात पोहोचले आहे. अमृतपाल पळून गेल्याबद्दल पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने पंजाब सरकारला फटकारले आहे. 

अमृतपाल सिंह पळून गेल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला फटकारले. आपल्याकडे ८० हजार पोलिस आहेत, तरीही तुम्ही अमृतपालला अटक का करू शकला नाहीत, असा सवाल हरियाणा आणि पंजाब उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने पंजाबचे महाधिवक्ता विनोद घई यांना केला.

Amritpal Singh News
Budget Session : अजित पवारांचा खट्याळपणा, शंभूराज देसाईंच्या पायावर दिली बुक्की!

अमृतपाल सिंग कोण आहे?

अमृतपाल सिंग हा पंजाबमधील अमृतसरमधील जल्लूपूर खेडा गावचा रहिवासी आहे. त्याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले. त्याने खलिस्तान, भिंद्रनवाले आणि त्यासंबंधीचे सर्व ज्ञान इंटरनेटमुळे मिळवले. तो दुबईत राहून ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करत होता. दुबईतील काम आटोपून गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात तो पंजाबला परतला.

अमृतपाल हा जर्नेलसिंग भिंद्रनवालेचा समर्थक आहे. तो खलिस्तानी समर्थक आहे. अमृतपालला सप्टेंबरमध्ये संस्थेचा प्रमुख बनवण्यात आलं आहे. 'वारीस पंजाब दे' ही संघटना अभिनेता संदीप सिंग उर्फ ​​दीप सिद्धूने स्थापन केली होती. २६ जानेवारी २०२१ रोजी लाल किल्ल्यावर झालेल्या दंगलीत दीप सिद्धू हा मुख्य आरोपी होता.

Amritpal Singh News
Pankaja : पंकजा मुंडेंचं पुन्हा अडचणीत टाकणारं विधान; म्हणाल्या, तुमची लेक देशाची पंतप्रधान...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com