मोठी बातमी! राज्यात लवकरच होणार मेगा पोलिस भरती|Maharashtra Police Recruitment 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस

मोठी बातमी! राज्यात लवकरच होणार मेगा पोलिस भरती

राज्यात लवकरच मेगा पोलिस भरती होणार असून दुसऱ्या टप्प्यातील तब्बल 7231 पदांची भरती होणार आहे. या संदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली.

दरवर्षी पोलिस भरतीसाठी लाखो तरुण आतुरतेने वाट बघत असतात मात्र आता त्यांच्यासाठी हा मोठा क्षण आहे. कारण लवकरच राज्यात 7231 पदांची होणार आहे. याबाबत लवकरच अधिकृत सविस्तर माहिती दिली जाणार. याआधी पहिल्या टप्प्यात 5200 पदांची पोलिस भरती झाली होती. (Maharashtra Police Recruitment 2022)

हेही वाचा: 'ठाकरे' नावाचा करिष्माच सेनेला तारणार? शिवसैनिक कोणासोबत?

राज्यातील पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. ग्रामीण भागातील तरुणांना सर्वाधिक संधी देणे हा यामागचा उद्देश आहे. पोलिस भरतीसाठी राज्याच्या गृह विभागातर्फे रिक्त 7231 पदे भरली जाणार.

हेही वाचा: Sakal Survey : बंडखोर आमदारांच्या विरोधात रस्त्यावर उतरणार का?

कारण दोन वर्षांपूर्वीच राज्यातील पोलीस दलात भरतीचे सरकारचे नियोजन होते. परंतु कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ही भरती प्रक्रिया पूर्ण क्षमतेने पोलीस भरती झाली नव्हती. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान पोलीस भरतीबाबत सूचक वक्तव्य देखील केले होते. त्यानंतर पहिल्या टप्प्यात 5200 पदांची पोलिस भरती करण्यात आली होती तर आता 7231 पदांची भरती केली जाणार.

Web Title: Maharashtra Police Recruitment Will Soon Check Here Details

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..