
दौंड : राष्ट्र नक्षलमुक्त करण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केल्यानंतर महाराष्ट्र पोलीस दलाची जबाबदारी वाढलेली आहे. नवप्रविष्ठ पोलिसांनी नक्षल प्रभावित क्षेत्रांमध्ये सेवा बजावून या कारवाईत योगदान द्यावयाचे आहे, असे आवाहन राज्य राखीव पोलिस दलाचे अपर पोलिस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी केले आहे.