मंत्री जितेंद्र आव्हाडांकडून पोलिसांना खुशखबर!

टीम ई-सकाळ
Friday, 24 January 2020

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पोलिसांच्या घरांसह फोन टॅपिंग प्रकरण या विषयांवरही भाष्य केले.

मुंबई : राज्यात सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांना राज्याचे गृहराज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खुशखबर दिली आहे. राज्यातील म्हाडाच्या सर्व प्रकल्पांमध्ये पोलिसांसाठी घरे आरक्षित ठेवणार असल्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मीडियाशी बोलताना स्पष्ट केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

काय म्हणाले आव्हाड?
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पोलिसांच्या घरांसह फोन टॅपिंग प्रकरण या विषयांवरही भाष्य केले. जितेंद्र आव्हाड म्हणाले, 'राज्यात यापुढं म्हाडाची 10 टक्के घरं पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. पोलिस दलातील हवालदार चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी ही घरे आरक्षित असणार आहेत. त्याचबरोबर सर्वसामान्यांना परवडणारी घरे देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल.' म्हाडामध्ये कोणतिही फाईल 45 दिवसांच्या आत निकाली काढली जाईल, अशी ग्वाहीदेखील मंत्री आव्हाड यांनी यावेळी दिली. 

मुंबईच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फोन टॅपिंग आणि पवारांची सुरक्षा!
फोन टॅपिंग प्रकरणावरही जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केले. ते म्हणाले, 'माझी जेवढी भाषण झाली त्यात सर्वांत आधी मी भीमा कोरेगाव आणि फोन टेपिंग हे आरोप केले आहेत. याची सखोल चौकशी करावी अशी मागणी मी कॅबीनेटमध्ये करणार आहे.' केंद्र सरकारने ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सुरक्षा काढली, तरी आम्ही घाबरत नाही. मुळात आम्ही असं सुडाचं राजकारण करत नाही. शरद पवार यांच्यावर त्याकाळी गोपीनाथ मुंडे प्रचंड आरोप करायचे त्यावेळी पवारांनी मुंडे यांच्या सुरक्षेत वाढ केली होती. आजही, फडवणवीस राज्यात मुख्यमंत्री नाहीत तरी, त्यांची सुरक्षा आमच्या सरकारने कायम ठेवली आहे, असेही आव्हाड यांनी स्पष्ट केले.

मुंबईच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलिस वसाहतींची अवस्था वाईट
राज्यात अनेक शहरांमध्ये पोलिस वसाहतींची अवस्था वाईट आहे. जुनी घरे, पिण्याच्या पाण्याची, सांडपाण्याची सुविधा नाही, अशा अवस्थेत अनेक वसाहती आहेत. या संदर्भात मीडियाने अनेकवेळा प्रश्न उपस्थित करूनही, पोलिस वसाहतींचे चित्र बदलेले नाही. आता राज्य सरकारच्या या निर्णयामुळं पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा मिळालाय. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra police will have 10 percent reservation in mhada jitendra awhad