
Eknath Khadse On Shivsena : शिवसेनेत सध्या निर्माण झालेली फूट राज्याच्या हिताची नसून, यामुळे भाजपला अधिक मजबूत होण्यास बळ मिळत आहे, असे मत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे. दोघांच्या भांडणामुळे शिवसेनेचे दोन तुकडे झाले असून पक्ष दुभंगला असल्याचेही खडसे म्हणाले. ते जळगावातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
खडसे म्हणाले की, शिवसेना पक्षाची सद्यस्थिती जी आहे, यात उद्धव ठाकरेंनी काय केलं आणि एकनाथ शिंदे यांनी काय केलं, अशा प्रकारे एकमेकांना दोष देण्यात काहीही अर्थ नसून, धनुष्यबाण मोडलं ही वस्तुस्थिती नाकारता येणार नसल्याचे ते म्हणाले. काही चुका या उद्धव ठाकरे यांच्याकडूनही झाल्या असतील. मात्र, एखादी चूक एवढी मोठी नसावी की, ज्यामुळे पक्ष संपवून टाकावा. आता तेही संपले आणि तुम्हीही संपले, अशी स्थिती निर्माण होता कामा नये असे खडसे यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी न्यायलयदेखील काही वेगळा निर्णय देईल असे वाटत नसल्याचे म्हटले आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी मोठ्या मेहनतीने शिवसेना राज्यात उभी केली. त्यांच्याच मेहनतीमुळे धनुष्यबाणाला एक वेगळी प्रतिष्ठाही संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झाली. वर्षानुवर्ष बाळासाहेब ठाकरे यांची जी पुण्याई होती, त्या शिवसेनेचे दोघांच्या भांडणामुळे दोन तुकडे झाले असून शिवसेना ही दुभंगली गेली असल्याचे ते म्हणाले. वैयक्तिक शत्रुत्वाचे राजकारण सुरू, मात्र त्यामुळे राज्याचा विकास मागे पडतोय असे मतही खडसे यांनी यावेळी व्यक्त केले. शिवसेना संपवण्यासाठी भाजप सत्तेचा दुरुपयोग करून ईडी , सीबीआयप्रमाणे निवडणूक आयोगाचाही दुरुपयोग करत असल्याचा आरोप खडसे यांनी यावेळी भजपवर केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.