Shivsena Case : नार्वेकर लंडनमध्ये, झिरवळ खाताहेत मिसळ! निर्णय घेणार कोण अन् कधी?

व्हिप माझ्याच शिवसेनेचा लागू होणार असे उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून ठामपणे सांगितले आहे.
Maharashtra Political Crisis Supreme Court
Maharashtra Political Crisis Supreme Courtesakal

Maharashtra Political Crisis Supreme Court : सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण झाली. यासगळ्यात सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलेली निरीक्षणं खूप काही सांगून जाणारी आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेला राजीनामा, त्यावेळच्या प्रतोदांचा निर्णय आणि राज्यपालांचा राजकीय हस्तक्षेप यावर यावर सर्वोच्च न्यायालयानं ताशेरे ओढले आहे. आता राहुल नार्वेकर आणि नरहरी झिरवळ यांच्यावरुन वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे.

व्हिप माझ्याच शिवसेनेचा लागू होणार असे उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून ठामपणे सांगितले आहे. आता नैतिकता पाळून राजीनामा द्या आणि निवडणूकांना सामोरं जा असे ठाकरे म्हटले आहे. यासगळ्यात काय होणार याकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले. सद्यस्थितीला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत. ज्यावेळी ठाकरेंच्या सरकारवर गदा आली तेव्हाचे अध्यक्ष नरहरी झिरवळ होते. झिरवळ यांनी घटनाक्रम उलटा फिरेल असा दावा केला आहे.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Maharashtra Political Crisis Supreme Court
Shivsena Case : सत्तासंघर्षाच्या निकालात कोर्टानं सांगितलेले महत्वाचे '7' मुद्दे!

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर अपात्रतेच्या निर्णयाचा अधिकार मलाच मिळेल. सत्तांतराचा घटनाक्रम उलटा मागे फिरवला जाईल. असे म्हटले होते. मात्र दरम्यानच्या काळात झिरवळ यांचा फोन नॉट रिचेबल असल्यानं वेगळयाच घडामोडींना सुरुवात झाल्याचे दिसून आले. दुसरीकडे नार्वेकर हे लंडनमध्ये आहेत. त्यांनीही आपल्याला अध्यक्ष म्हणून निर्णय घ्यावा लागणार असे म्हटले आहे.

सत्ता संघर्षासारख्या महत्वाच्या मुद्द्यावर कोर्टाची सुनावणी असताना लंडनला जाणे यावरुन देखील अनेक प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. आता नार्वेकर पुन्हा येणार कधी आणि न्यायालयाच्या निर्णयाचे पालन होणार कधी असा प्रश्न सोशल मीडियावरुन विचारला जात आहे

त्यावेळी विधिमंडळाचे अध्यक्षपद रिक्त असल्याने उपाध्यक्ष म्हणून माझ्याकडे पदभार होता. मी तत्कालीन अध्यक्ष म्हणून तो निर्णय घेतला होता. असे झिरवळ यांनी म्हटले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com